मुक्तपीठ टीम
सामान्याकडे नेतृत्व म्हटलं की आठवतो अनिल कपूरचा नायक चित्रपट. तो मुळात जिथं बनला त्या आंध्रातच घडलंय तसं. रस्त्यावर भाजी विकणाऱ्या एक पदवीधर तरुण त्याच्या शहराचा नगराध्यक्ष झालाय. आंध्र प्रदेशातील रायचोटी नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शेख बाशा यांची ही कहाणी सर्वांना प्रेरणा देणारी आहे. वायएसआर काँग्रेसने त्यांची या पदासाठी निवड केली आहे. पदवीधर असलेल्या शेख बाशा बेरोजगारीमुळे त्यांच्या गावात भाजीपाला विकत असत. परंतु अचानक त्याचे नशीब बदलले. बाशा यांना मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी रायचोटी नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवडले.
शेख बाशा त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाल्यामुळे खूश आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यामुळे त्यांना रायचोटीचे नगराध्यक्षपद मिळू शकले आहे. ते म्हणाले की, “पदवीधारक असूनही बेरोजगारीमुळे भाज्या विकाव्या लागल्या. आयुष्यात मला कोणतीही दिशा मिळाली नव्हती, परंतु वायएसआरने मला तिकीट दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला.”
वायएसआर कॉंग्रेस पक्षाने शेख बाशा यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याची संधी दिली. लोकांनी त्यांना निवडले. पक्षाच्या निर्णयाचा मान राखला. रायाचोटी नगरपालिकेत पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर अध्यक्ष आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे आपल्या उमेदवाराच्या कामगिरीकडे गेले. त्यांनी बाशा यांची नगराध्यक्षपदी नियुक्ती केली.
पाहा व्हिडीओ: