Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

स्टोरीटेलचा बंपर धमाका! हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद केवळ ३९९ रु. मध्ये वर्षभर!

October 23, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
storytell

मुक्तपीठ टीम 

‘स्टोरीटेल सिलेक्ट’ हा स्टोरीटेलच्या प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आहे. रसिकश्रोत्यांना जे आवडतं आणि ऐकायचं आहे, तेच देण्याचा प्रयत्न सिलेक्टच्या माध्यमातून स्टोरीटेलने केला असून स्टोरीटेलने गेल्या वर्षी ‘सिलेक्ट’ नावाचे एक विशेष सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले, जे श्रोत्यांना ११ वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये आपल्या आवडीची ऑडिओबुक्स निवडण्याचा विशेष पर्याय देत होते. या मॉडेलला संपूर्ण भारतातील श्रोत्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिल्याने स्टोरीटेलने आपल्या साहित्यप्रेमी रसिकांसाठी एक वर्षाचे सरप्राईझ देऊ केले आहे.

 

स्टोरीटेल सिलेक्ट ची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत  रू.९९९/- आहे. पण आता वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/-  वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात.  स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सचा आनंद घेता येईल.

 

मराठी भाषिकांसाठी ही मोठी संधी आहे. स्टोरीटेलने मराठीतील विलक्षण गाजलेल्या दर्जेदार साहित्यासोबतच नव्या दमाच्या लेखकांचीही नाळ ऑडिओबुक्सद्वारे साहित्यरसिकांसोबत जोडण्याचे उद्दिष्ट कायम ठेवले आहे.

 

मराठी भाषेतील हजारो दर्जेदार ऑडिओबुक्स ‘स्टोरीटेल सिलेक्ट’मध्ये रसिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. ‘सिलेक्ट मराठी’मध्ये सर्व मराठी ऑडिओबुक व ईबुकचा समावेशआहे.

 

“ऑडिओबुक ऐकण्याकडे लोकांचा सतत कल वाढत असून त्यांचे कुतूहल चाळविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. ११ भारतीय भाषांमधील ऑडिओबुक्सच्या अमर्यादित वार्षिक योजनेमागे आमचा मुख्य हेतू म्हणजे श्रोत्यांना पॉकेट फ्रेंडली करणे आहे. मनोरंजनाची नवीन शैली, ३९९ या अत्यंत माफक वार्षिक मूल्य यामुळे ऑडिओबुक्स ऐकण्याची अधिकाधिक श्रोत्यांना सवय लागेल” असे ‘स्टोरीटेल इंडिया’चे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले.

 

साहित्यप्रेमी श्रोत्यांना स्टोरीटेलवर मराठीतील अभिजात साहित्य ऐकायला मिळेल. यात ज्येष्ठ लेखकांपासून ते प्रतिथयश व नवोदित लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. पु. ल. देशपांडे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे, वि. वा. शिरवाडकर, गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, अनिल अवचट, जयंत दळवी, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, दिबा मोकाशी, सदानंद मोरे अशा मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या लेखकांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या कलाकृती श्रोत्यांना या ‘सिलेक्ट’  मध्ये ऐकता येतील. याशिवाय नव्या पिढीतील प्रतिभावंत लेखकांची लोकप्रिय ओरिजिनल ऑडिओ बुक्सही यात ऐकता येतील.ही ऑडिओबुक्स लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, ललित प्रभाकर, उमेश कामत, गौतमी देशपांडे, संदीप खरे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अतुल पेठे, उदय सबनीस आदि नामवंतांनी वाचली आहेत.

 

स्टोरीटेल जगभरातील २० देशांत कार्यरत असून त्याचे मुख्यालय स्टॉकहोम,स्वीडन येथे आहे. अधिक माहितीसाठी https://www.storytel.com या वेबला भेट द्या


Tags: Bhalchandra Nemanep l deshpandestory tellV V Shirwadkarपु.ल. देशपांडेभालचंद्र नेमाडेवि.वा. शिरवाडकरस्टोरीटेलर
Previous Post

वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची निर्मिती, विदर्भातून जगभर निर्यातीच्या संधी

Next Post

इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास बनवलेले इ-फ्लुईड्स आता भारतातही!

Next Post
इ-फ्लुईड्स

इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास बनवलेले इ-फ्लुईड्स आता भारतातही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!