मुक्तपीठ टीम
देशात सर्वांच लक्ष वेधून घेणारी निवडणूक बंगालमध्ये लढवली गेली. एखाद्या युद्धासारखीच प्रत्येक रणनीती या मतयुद्धात वापरली गेली. या निवडणुकीत सर्वत्र अगदी राष्ट्रीय स्तरावरही गाजली ती एकच घोषणा…’खेला होबे’! आज ममता बॅनर्जींनी खेळ करून दाखवल्यानंतर जाणून घ्या या घोषणेबद्दल सर्व काही…
“खेला होबे आले कसे…”
• बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी ‘खेला होबे’ ही सर्वात मोठी घोषणा ठरली होती.
• हे एक रॅप गाणं आहे. जे तृणमूलचे युवा नेते देबांगशू यांनी तयार केले.
• जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.
• ममता बॅनर्जींपासून ते मोदीपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे खेला होबे.
• बंगालच्या निवडणुकीत खेला होबेची सुरुवात कशी झाली हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
• खेला होबेचा मराठीतून अर्थ होतो खेळ होणार.
• कृषी विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की ‘एशो बोंधू, खेलते चाओ’ (चला बंधू, खेळायचं आहे). तिथून ही गोष्ट देबांगशूंच्या मनात आली.
• मग या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांची एक कविता ‘.. ‘..खैला मोदेर लड़ाई करा.. खैला मोदेर बांचा-मरा.. खेला मोदेर गड़ा..’ ( खेल आमचा संघर्ष आहे.. खेळ आमचा जीवन-मृत्यू आहे ..खेळ ही आमची निर्मिती आहे ..) त्या रचनांनीही त्यांना प्रेरित केले.
• त्यासोबत बदलत्या राजकीय परिस्थितीचाही त्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम झाला.
• बंगालमध्ये भाजपाची घुसखोरी, तृणमूल कॉंग्रेसमधील नेत्यांमध्ये फूट पाडत आपल्या पक्षात आणणे, या सर्व गोष्टींनी देबांगशूच्या मनातून ‘खैला होबे, खैला होबे’ रचले गेले.
• बंगालच्या निवडणुकीत ७ जानेवारीला तृणमूल काँग्रेसचे युवा नेते देबांगशु भट्टाचार्य देव यांनी हा व्हिडीओ यूट्युबवर अपलोड केला.
• फेसबुकच्या व्हिडीओमध्ये देबांगशु भट्टाचार्य खेला-खेला-खेला होबेचा नारा देत तरूणांमध्ये उत्साह निर्माण करताना पाहायला मिळाले.
• देवांगशु निवडणूक रॅलीत हा नारा देतात आणि गर्दी सोबत म्हणतात खेला होबे.
• मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पण आपल्या प्रत्येक सभेत म्हणतात खेला होबे.
• खरंतर ही घोषणा बांगलादेशातून आली आहे, असंही म्हटले जाते. तेथे आवामी लीग पार्टीने खेला होबेचा नारा दिला
My dear friend, The game is ON! #KhelaHobe pic.twitter.com/TmzsWDedk9
— Debangshu Bhattacharya Dev (@ItsYourDev) March 2, 2021
कोण आहेत देबांगशु
• देबांगशु हे युवा नेते आणि तृणमूल काँग्रेसचे ते स्टार प्रचारक आहेत.
• देवांगशु हे सिव्हिल इंजिनिअर आहेत.
• ते पूर्णवेळ राजकारणात सक्रीय आहेत.
• आता देवांगशु यांनी या नाऱ्याला रॅपमध्येही सादर केले आहे.
• हे गाणं निवडणुकीचं थीम सॉंग बनलं आहे आणि तितकच प्रसिद्ध झालं आहे.
• त्यांनी ममता दीदी फीर एक बार आणि दिल्ली जाबे हवाई चोटी हे गाणं सुद्धा लिहलं आहे आणि ते लोकप्रियही झाले आहेत.