सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
गानसम्राज्ञी लता मंगेशकर या संगीत क्षेत्राला लाभलेलं एक मोठं वरदान. लतादीदी म्हणजे संगीताचं विद्यापीठ. आपल्या आवाजाने ६ दशकाहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आज जगात क्वचितच कुणी संगीत रसिक असावा ज्याला लता हे नाव ठाऊक नसावं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ‘लता’ हे खरं त्यांचं नाव नव्हतंच! ज्या नावाला सूरमयी वलय लाभलं, त्या नावामागेही एक रंजक कहाणी आहे.
लता मंगेशकर यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मात्र त्यांचं पाळण्यातलं नाव हेमा होतं. त्यांचे वडिल पंडीत दिनानाथ मंगेशकर हे अभिनेते आणि संगीतकार होते. त्यांच्याकडूनच लतादीदींना संगीताचा वारसा लाभला.
लता मंगेशकरांचं मूळ गाव गोव्यातलं मंगेशी. दिनानाथ मंगेशकरांच्या आई येसूबाई मंगेशकर या भजन कीर्तन करायच्या. लतादीदींचा जन्म झाला त्यावेळी त्यांचं नाव हेमा ठेवलं गेलं. दिनानाथ मंगेशकरांनी ‘भावबंधन’ नाटकात काम केलं. त्यात महिला पात्राचं नाव लतिका होतं. त्यावेळी दिनानाथ मंगेशकरांना हे नाव इतकं आवडलं की त्यांनी आपल्या मुलीचं नाव हेमा बदलून लता ठेवलं. तिच छोटी हेमा जगप्रसिद्ध लता मंगेशकर म्हणून नावारुपाला आल्या.
आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर संगीत क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. अनेक गायक, गायिका आले आणि गेले मात्र लता मंगेशकरांसारखं कुणी झालं नाही आणि होणेही नाही.
लतादीदींची अजरामर स्वरयात्रा…
- लता मंगेशकर यांना अनेक उपाध्यांनी संगीत रसिकांनी गौरवलं.
- त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे सर्वच त्यांना ‘दीदी’ म्हणून संबोधत असत.
- त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया, ‘सूर सम्राज्ञी, स्वरलता, गानकोकिळा अशा अनेक नावांनी संबोधलं जात असे.
- भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्कृष्ट गायिकांपैकी एक म्हणून त्या अजरामर आहेत.
- लता मंगेशकर यांनी १९४१मध्ये १६ डिसेंबरला पहिले गाणे गायलं.
- त्यांच्या स्वरयात्रेला सुरुवात झाली, तेव्हा त्यांचं वय अवघं १३ वर्षे होतं.
- त्यांनी आपल्या स्वरयात्रेत ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
- तब्बल ३६ भाषांमधील गाण्यांना स्वरसाज चढवणाऱ्या लतादीदींसारख्या त्याच एकमेव!
लता मंगेशकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. तसेच लता दीदींना इंडस्ट्रीमध्ये वर्षे पुर्ण केली आहेत. ज्या त्या १३ वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस १६ डिसेंबर १९४१ होता.