पोटात गॅस होणे ही समस्या हल्ली सामान्य तक्रार बनली आहे. खरंतर वायू म्हणजे गॅस हा पचन प्रक्रियेतील एक सामान्य भाग आहे. जेव्हा पचन प्रणाली योग्यरित्या कार्य करते त्यावेळी तेथे वायू तयार होतो आणि तो ढेकर किंवा पादण्याच्यामार्फत बाहेर पडतो. पण जर गॅस पचनेंद्रियांमध्ये व्यवस्थित चालत नसेल किंवा बाहेर येत नसेल तर वेदना होण्याची समस्या उद्भवते. अधिक गॅस निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात गॅस निर्माण होतो.
खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास गॅस पासून निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. ढेकर येणे विशेषत: जेवणानंतर ढेकर येणे ही साधारण बाब आहे. एक सामान्य व्यक्ती दिवसात २० वेळा गॅस सोडू शकतो. अशातच जर त्या व्यकतीने सामान्य क्षमतेपेक्षा जास्त गॅस सोडत असेल आणि यामुळे शरीरात वेदना होत असतील तर ती वैद्यकीय समस्या आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असेल. जर तुम्ही देखील गॅसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, काही गोष्टी सोडल्यास किंवा कमी केल्यास आपण गॅसची समस्या कमी करू शकता.
पोटात गॅस का होतो?
- खाताना किंवा पिताना हवा तोंडामार्फत पोटात गेल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. ज्यावेळी आपण ढेकर देतो त्यावेळेस पोटातील सर्वात जास्त गॅस शरीराबाहेर येतो.
- जेव्हा बॅक्टेरिया उत्तेजित होतात तेव्हा पोटातील मोठ्या आतड्यात गॅस तयार होतो. तसेच फायबर, काही स्टार्च आणि काहीवेऴेस साखर जेव्हा लहान आतड्यात पचत नाही तेव्हा गॅसची समस्या उद्भवते.
- बॅक्टेरियासुद्धा गॅसच्या काही भागाचे सेवन करतात. जेव्हा एखादी व्यक्ती पादते तेव्हा शरीरातील गॅस गुद्द्वारातून बाहेर सोडला जातो.
बीन्स आणि मटार, फळभाज्या, काही धान्य यांसारख्या अन्नपदार्थांमुळेही गॅस होतो. - हायफायबरयुक्त पदार्थ गॅस तयार करतात. तसे, फायबर शरीराच्या पाचन तंत्रासाठी कार्य करण्यासाठी आणि रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
- सोडा आणि बिअर सारख्या कार्बोनेटेड पेयामुळे पोटातील गॅसची समस्या वाढते.
- खाण्याच्या वेगवेगळ्या सवयी म्हणजे घाईत खाणे, स्ट्रॉद्वारे पाणी पिणे, च्युइंगम चघळणे, खाताना बोलणे यामुळे पोटात गॅस तयार होतो.
लक्षणे
- ढेकर
- गॅस निघणे.
- पोटात वेदना, किंवा मुरड येणे.
- पोट फुगल्यासारखे वाटणे.
- पोटाच्या आकारात वाढ
तुम्हाला गॅसची समस्या अधिक वाटत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.