मुक्तपीठ टीम
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड-सी आणि-डी ही परिक्षा होणार आहे. ही परिक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये होईल. परिक्षेनंतर स्टेनोग्राफर, ग्रेड सी, ग्रुप-बी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी, ग्रुप-सी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी, ०५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Ol_Lbx4aKeTzvAJD1WPSAn8r4R8Tc23A/view