मुक्तपीठ टीम
देशांतर्गत बाजारातील पोलादाच्या किंमती वाढल्या आहेत. पोलादाचे दर टनामागे चार हजार ते चार हजार ९०० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत पोलाद उत्पादक कंपन्यांनी किंमतींमध्ये ही वाढ केली आहे. यामुळे पोलादाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणारी घर बांधणी आणि वाहन निर्मितीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्याचा परिणाम त्यांचीही महागाई वाढण्यावर होऊ शकत आहे.
पोलादाची महागाई
• दरवाढीनंतर एचआरसीची किंमत प्रति टन ७० ते ७१ हजार रुपयांवर गेली आहे.
• त्याचबरोबर सीआरसीची किंमत प्रति टन ८३ ते ८४ हजार रुपये झाली आहे.
• एचआरसी आणि सीआरसी फ्लॅट स्टील आहेत.
• हे मुख्यतः वाहन, उपकरण आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते.
• त्यामुळे घरांच्या आणि घरगुती उत्पादनाच्या उत्पादन मूल्यात वाढ होऊन या वस्तूंच्या किमती वाढू शकतात असे समजले जाते.
जागतिक बाजारातही वाढले पोलादाचे दर
• जागतिक बाजारात पोलादाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
• भारतीय लोह धातूंचे दर प्रति टन ४,००० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
• यामुळे भारतातही पोलादाच्या किंमती वाढल्या आहेत.
• देशांतर्गत पोलादाच्या किंमती आंतरराष्ट्रीय किमतींच्या तुलनेत अजूनही २०-२५% कमी आहेत.
• देशांतर्गत मागणी कमी असल्याने बहुतेक पोलाद कंपन्यांनी निर्यातीत वाढ केली आहे.