मुक्तपीठ टीम
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक बँकिंगचे काम आता घर बसल्या करु शकतात. जर ग्राहकांना तातडीने रोख रक्कम हवी असल्यास बँक ही रोख रक्कम ग्राहकांच्या घरी पोचविण्यची व्यवस्था करते. याला बँकेने होम बँकिंग सेवा म्हटले आहे. सध्या ग्राहक काही निवडक शाखांमध्येच या सुविधेचा वापर करू शकतात. जर ग्राहकांनी डोर स्टेप बँकिंग सुविधेसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरच ही नोंदणी करणे गरजेचे आहे. तरच ही सेवा मिळू शकेल.
एसबीआयने आपल्या ट्वीटद्वारे ग्राहकांना आपल्या डोअर स्टेप सेवांविषयी माहिती दिली आहे. या सुविधेबद्दल अधिक जाणून घेण्यास टोल फ्री क्रमांक १८००१०३७१८८ किंवा १८००१२१३७२१ वर कॉल करू शकता.
१. या सेवांमध्ये रोख रक्कम देणे, रोख रक्कम घेणे, धनादेश जमा करणे, टर्म डिपॉझिट सल्ला देणे, लाइफ सर्टिफिकेट आणि केवायसी कागदपत्रे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
२. कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत १८००११११०३ या क्रमांकावर कॉल करुन या सेवांसाठी विनंती केली जाऊ शकते.
३. या सेवेच्या विनंतीची नोंदणी होम ब्रांचवर केली जाईल.
४. डोरस्टेप बँकिंग सेवा केवळ केवायसी ग्राहकांसाठीच उपलब्ध आहेत.
५. रोख रक्कम काढण्यासाठी आणि रोख ठेवींसाठी दररोज २०,००० रुपयांची व्यवहार मर्यादा दिली आहे.
पाहा व्हिडीओ: