Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पांडवकडा धबधबा पर्यटन विकासाबरोबरच आदिवासी मुलांमधील टॅलेंट हंट ते नर्चरिंगसाठी प्रयत्न!

May 12, 2022
in featured, चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Pandavakada Falls Tourism

मुक्तपीठ टीम

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांच्या विकासासाठी खास निर्देश दिले आहेत. वनविभागाच्या निकषांचा विचार करुन डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी केली जाईल. पनवेल येथील पांडवकडा धबधबा विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत. तसेच किहीम येथील विकास कामे वेगाने करण्यात येतील. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस अलिबागचे उपवन संरक्षक आशिष ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे इको टुरिजम बोर्डाचे चेअरमन विकास गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रदीप कुमार सहभागी झाले होते.

चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी

मंत्री तटकरे म्हणाल्या, ४४ हेक्टर क्षेत्रावर अस्तित्वात येणाऱ्या या प्रकल्पासाठी वनविभागाने सल्लागार नेमून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. सल्लागार नेमल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे सोपे होईल. ज्यांनी यापूर्वी राज्य शासनाकडे संबंधित विषयाबाबत सल्लागार म्हणून काम केले आहे अशांपैकी एक सल्लागार नेमून उद्यानाबाबतचा आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री श्रीमती तटकरे यांनी दिले. अनुभवी सल्लागाराच्या मदतीने तयार केलेला सदर प्रस्ताव इको टूरीजम बोर्डाकडे पाठवून पुढील कार्यवाही करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

पांडवकडा धबधबा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत निर्देश

  • पनवेल येथील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला पांडवकडा धबधब्याच्या विकासासंदर्भातील विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही मंत्री श्रीमती तटकरे यांनी पर्यटन विभागास दिले. पांडवकडा येथे मूलभूत सुविधा देणे हा मूळ उद्देश असून त्यादृष्टीने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी बैठकीदरम्यान दिले.
  • यावेळी सिडकोचे मुख्‍य नियोजनकार आशुतोष उईके यांनी पांडवकडा प्रकल्पाचे सादरीकरण केले. या बैठकीस सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक – 3, डॉ. कैलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. सिडकोच्या माध्यमातून पांडवकडा प्रकल्पास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
  • सिडकोने वनविभागाकडे सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा, वनविभागाने रितसर तपासणी करुन नियमानुसार प्रकल्पास मान्यता द्यावी, प्रकल्पक्षेत्र वनजमिनीत असल्याने त्यासंदर्भात आवश्यक सर्व नाहरकत प्रमाणपत्रे सिडकोस उपलब्ध करुन द्याव्यात, सिडकोने प्रकल्प एजन्सी म्हणून विकसित करावा, आदी निर्देश मंत्री श्रीमती तटकरे यांनी दिले.

किहीम येथे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अलींचे शिल्प तयार करा – राज्यमंत्री तटकरे

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या किहीम या जन्मगावी पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राचा आराखडा आणि किहीम येथील विकासकामांबाबतचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. डॉ. सलीम अली यांची ओळख सांगणारी शिल्पे बनवून ती केंद्र परिसरात बसविण्यात यावीत, शिल्प बनविण्याचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडे देण्यात यावे असे निर्देशही मंत्री श्रीमती तटकरे यांनी दिले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती तयार करण्याचे निर्देशही मंत्री श्रीमती तटकरे यांनी दिले.

सदर प्रकल्प ५ टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. यातील पहिल्या ४ टप्प्यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उभ्या करणे व बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. तर पाचव्या टप्प्यात राज्य शासन आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांच्यात सामंजस्य करार होईल. त्यानंतर या केंद्राचे संचलन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडे जाईल. हे केंद्र अस्तित्वात आल्यास जैवविविधता आणि पक्षीनिरिक्षणाची युवकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा डॉ. सलीम अली यांचे नातलग डॉ. मुराद फते अली यांनी व्यक्त केली. यावेळी देवेंद्र बावधने, राहुल खोत उपस्थित होते. यावेळी बीएनएचएसचे सदस्य बीट्टू सहगल ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले.

आदीवासी मुलांमधील टॅलेंट हंट ते नर्चरिंगपर्यंत पाठपुरावा

  • अलिबागच्या आदिवासी मुलांसाठी ॲथलेटीक्स अणि तिरंदाजी प्रतिभा ओळखीच्या प्रस्तावाबाबत ॲडॉप्ट स्पोर्ट क्लबची सादरीकरणाबाबत दालनात बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्यातील आदीवासी समाजातील मुलांमधील खेळातील प्रतिभा शोधून त्यांना चांगल्या सुविधा देता येतील अशी भूमिका ॲडॉप्ट स्पोर्ट क्लबने मांडली.
  • अलिबागपेक्षा सुधागड, कर्जत तालुक्यात अधिक आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी क्लबने चाचण्या घ्याव्यात अशा सूचना दिल्या. आदीवासी मुलांमधील टॅलेंट हंट तेrनर्चरिंगपर्यंत पाठपुरावा करा, असे निर्देश रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना दिले. ते ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले हेाते. यावेळी क्रीडा विभागाचे उपसचिव समीर सावंत, ॲडॉप्ट स्पोर्टचे दर्शन वाघ, अभिजीत कुलकर्णी यांनी प्रकल्पाबाबतची माहिती सादर केली.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsMinister of State for Tourism Aditi TatkaremuktpeethNurturingPandavakada Falls TourismRaigad districtTalent HuntTourism Minister Aditya ThackerayTribal Childrenआदिवासी मुलंचांगली बातमीटॅलेंट हंटनर्चरिंगपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरेपांडवकडा धबधबा पर्यटनमुक्तपीठराज्य शासनरायगड जिल्हा
Previous Post

वयाच्या ८७ व्या वर्षी नेते झाले दहावीनंतर बारावी! ‘दसवी’वाल्या अभिषेक बच्चननं केलं कौतुक!

Next Post

अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचं अकाली निधन! शिवसेनेनं गमावला मोलाचा शिलेदार…

Next Post
shivsena mla ramesh latke death

अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचं अकाली निधन! शिवसेनेनं गमावला मोलाचा शिलेदार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!