मुक्तपीठ टीम
ऑनलाइन बँकिंगचा वापर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आज शुक्रवार संध्याकाळी आणि शनिवार या दोन दिवशी ऑनलाइन बँकिंग सेवेत अडथळा निर्माण होणार असल्याची माहिती स्टेट बँकेने दिली आहे.
स्टेट बँकेच्या ऑनलाइन सेवा का नसतील?
• स्टेट बँकेने ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे.
• त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शुक्रवार, ७ मे २०२१ रोजी संध्याकाळी ७.१५ वाजल्यापासून शनिवार, ८ मे २०२१ च्या रात्री १.४५ वाजेपर्यंत सिस्टम देखभालीचे काम चालणार आहे.
• यादरम्यान, ग्राहकांसाठी आयएनबी, योनो, योनो लाइट, यूपीआय सेवा उपलब्ध होणार नाही.
• मागील महिन्यात करण्यात आलेल्या देखभालीच्या कामांनंतर एसबीआय योनो, योनो लाइट, इंटरनेट बँकिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) बँकेच्या डिजिटल बँकिंगमध्ये समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्याच्या अपग्रेडेशनसाठी हे दोन दिवस डिजिटल सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध असणार नाही.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience.
#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/JogglXemol— State Bank of India (@TheOfficialSBI) May 6, 2021
देशातील सर्वात मोठी बँक…स्टेट बँक ऑफ इंडिया
• देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआय बँकेकडे पाहिले जाते.
• या बँकेच्या २२ हजाराहून अधिक शाखा आणि ५७,८८९ एटीएम आहेत.
• ३१ डिसेंबर २०२० पर्यंत इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवाचा वापार करणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे ८.५ कोटी आणि १.९ कोटी एवढी आहे.
• तसेच बँकेच्या युपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या १३.५ कोटी आहे.