Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्रीधर फडके यांच्या ‘बाबूजी आणि मी’ सांगीतिक मैफलीची विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे आयोजन

November 24, 2022
in घडलं-बिघडलं
0
Sridhar Phadke's musical concert organized by Student Aid Committee

मुक्तपीठ टीम

देव देव्हाऱ्यात नाही… देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… सखी मंद झाल्या तारका… फिटे अंधाराचे जाळे… ज्योती कलश छलके… तोच चंद्रमा नभात… धुंदी कळ्यांना… सांज ये गोकुळी… ओंकार स्वरूपा… अशा एकामागून एक अवीट गोडीच्या भाव-भक्तिपर रचनांनी रसिकांना शांत रसाची अनुभूती दिली.
निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त देणगीदार व हितचिंतकांसाठी आयोजित श्रीधर फडके यांच्या ‘बाबूजी आणि मी’ या सांगीतिक मैफिलीचे! गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगलेल्या या मैफलीत अनेक अजरामर गीतांची लयलूट झाली. स्वरांमधून भावछटांचे अचूक प्रकटीकरण करणारे ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या, तसेच स्वतःच्या रचना बाबूजींचे सुपुत्र व गायक-संगीतकार श्रीधर फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने पेश केल्या.
यावेळी समितीच्या वतीने ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक नितीनभाई कारिया, माजी विद्यार्थिनी माधवी टेमगिरे, या देणगीदारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. उद्योजक भूषण वाणी, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते, कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबुजींच्या गायकीचे परिपूर्ण स्वरदर्शन घडवतानाच श्रीधर फडके बाबुजींनी प्रत्येक गीताला संगीत देताना व गाताना केलेला त्यामागचा खोल विचारही मांडत होते. त्यातून बाबूजी, गदिमा व इतर समकालीन गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यातील स्नेहबंध उलगडला जात होता. श्रीधरजींबरोबर गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी-साकुरीकर याही होत्या. समर्थ रामदास यांच्या ‘ताने स्वर रंगवावा’ ही रचना पुणतांबेकर यांनी जोरदार तानांच्या सहाय्याने सादर केली. त्यांनी सादर केलेली ‘आज कुणीतरी यावे’ ही रचना असो की साकुरीकर यांनी सादर केलेली ‘ऋतू हिरवा’ असो रसिकांमधून ‘वन्स मोअर’ची मागणी होत होती. ‘कानडा राजा पंढरीचा’ गीताने पूर्वार्ध रंगला.
मध्यंतरानंतर गंगू बाजाराला जाते जाऊद्या, उदे ग अंबाबाई, माता भवानी जगताची जननी, जिवलगा कधी रे येशील तू अशा बहारदार गीतांसह यमन, मल्हार, केदार, भूपश्री रागांचे दर्शन घडविले. श्रीधरजींनी आपल्या या सुरेल मैफलीत रसिकानाही सहभागी करून घेत त्यांनाही गायला लावले. ओंकार स्वरूपाच्या ओळी सारे रसिक गात होते आणि त्यामुळे समूहगानाचा एक अनोखा आविष्कार घडत होता. ‘गंगु बाजारला जाते जाऊद्या’ या गीतावर सगळ्यांनी ठेका धरला. गावाकडच्या घराचे वर्णन करणाऱ्या ‘खेड्यामधले घर कौलारू’ने जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘घर असावे घरासारखे’मधून नात्यातला भावस्पर्श जागा झाला. ‘बलसागर भारत होवो’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
मेघना अभ्यंकर यांनी ओघवत्या शैलीत केलेल्या निवेदनाने रसिकांची मने जिंकली.

Tags: Students Aid Fundबाबूजी आणि मीविद्यार्थी साहाय्यक समितीश्रीधर फडकेसांगीतिक मैफल
Previous Post

आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही, ही भूमिका अतिशय चुकीची – अजित पवार

Next Post

दिलीप सोनिगरा रॉयल्स ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’चे विजेतेपद

Next Post
Dilip Sonigara Royals

दिलीप सोनिगरा रॉयल्स 'पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग'चे विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!