मुक्तपीठ टीम
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण मोठे शस्त्र आहे. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तसंच काही खासगी रुग्णालयांमध्ये रशियाची स्पुटनिक व्ही लस दिली जात आहे. नाशिकमध्येही स्पुटनिक व्ही लस उपलब्ध झाली असून शहरातील ३ खासगी रूग्णालयांमध्ये नागरिकांना ही लस मिळणार आहे. याकरीता दरही निश्चित करण्यात आले आहेत.
नाशिक शहरातील ३ खासगी रुग्णालयांमध्ये स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होणार आहे. नाशिकमध्ये सध्या भारतीय बनावटीच्या दोन लसी आणि विदेशातील एक अशा तीन प्रकारच्या लसी शहरात उपलब्ध आहे. कोविशील्ड,कोव्हॅक्सिन या दोन भारतीय बनावटीच्या तर रशियातील स्पुटनिक या ३ प्रकारच्या लसी आता नाशिकमध्येही उपलब्ध झाली आहे.
एका लसीच्या एका डोसची किंमत १,१४५ रुपये असून २८ दिवसांनी याचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत नाशिक शहरामध्ये ९ खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या शक्य ते ही लस खासगी रुग्णालयांमध्ये घेऊ शकतात. यासोबतच मनपाच्या सर्व केंद्रांवर सर्वांसाठी मोफत लसीकरण हे चालूच आहे.
खालील खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध
- अपोलो
- अशोका
- मानवता
- सहयाद्री
- एसएमबीटी
- सुश्रुत
- सुयश
- व्होकहार्ट
- लाईफ केअर
लसींचे दर
- कोविशील्ड- ७८० रूपये
- कोवॅक्सिन- १४१० रूपये
- स्पुटनिक व्ही- ११४५ रूपये