Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये आता क्रीडा विषय अनिवार्य असणार!

May 4, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
university

मुक्तपीठ टीम

बदलत्या काळानुसार आता आपली शिक्षणपद्धतीही बदलू लागली आहे. देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा विषय अनिवार्य असेल. शैक्षणिक संस्थांना आता विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीच्या उच्चस्तरीय समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींवर काम सुरु केले आहे. त्यानुसार शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा, विद्यार्थी आरोग्य, कल्याण, मानसिक आणि भावनिक आरोग्य यावर आधारित पहिली मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

ही मार्गदर्शक तत्त्वे राज्ये आणि विद्यापीठांना प्रसिद्ध केले जाईल. येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा हा विषय अनिवार्य होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक उपक्रमांशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे आता उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य समुपदेशकांबरोबरच आरोग्य तज्ज्ञ असणेही बंधनकारक असणार आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात प्रथमच प्रत्येक व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीशिवाय भावनिक पैलूंकडे लक्ष दिले आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्चस्तरीय समितीचे मत आहे. मात्र, तरुण पिढी अजूनही डिजिटल उपकरणात हरवलेली आहे. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसोबतच तरुणांनी त्यांच्या भावनिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचा उल्लेख होता. त्या आधारे ही तयारी करण्यात आली आहे.

शाळांमध्ये खेळ हा अनिवार्य विषय

  • उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये खेळ हा विषय अनिवार्य करण्यामागचे कारण म्हणजे ज्यामुळे सर्व विद्यार्थी कॅम्पस जीवनात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात.
  • खेळासह अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासह तणाव दूर होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • यापूर्वी २०१९ मध्ये, यूजीसीने उच्च शैक्षणिक संस्थांना फिटनेस योजना पाठवल्या होत्या. यामध्ये शाळेत प्रत्येकाला एक तासाचा खेळाचा कालावधी बंधनकारक करण्यात आला होता.
  • यामध्ये स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी, योगा, सायकलिंगचा पर्याय देण्यात आला.
  • याशिवाय, नृत्य, पारंपारिक विषयांच्या माध्यमातून फिटनेसवर भर दिला जातो. दर तीन महिन्यांनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

विद्यार्थ्यांना व्यावहारिक समस्या सोडविण्यास होणार मदत

  • या मार्गदर्शक ओळीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, क्रीडा क्रियाकलाप आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे हा आहे.
  • सर्व विद्यार्थ्यांनी तणाव, दबाव आणि व्यावहारिक समस्यांवर मात करणे आणि निरोगी मानसिक स्थिती राखणे आवश्यक आहे.
  • अभ्यासासह इतर कारणांमुळे विद्यार्थी दडपणाखाली राहतात, त्यामुळे या विषयांचा त्यांना फायदा होईल.

विद्यार्थ्यांसाठी सर्व्हिस सेंटर सुरू करणार

आता सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सर्व्हिस सेंटर सुरू करावी लागणार आहेत. संचालक किंवा डीन स्तरावरील प्राध्यापक श्रेणी किंवा शारीरिक शिक्षक यांना जबाबदारी दिली जाईल. ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जाईल. हे सर्व सिंगल विंडो सिस्टीम अंतर्गत काम करेल. याशिवाय गावातील महिला आणि मागासलेल्या मुलांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

उच्च शैक्षणिक संस्थांच्या परिसरात पादचारी मार्ग अनिवार्य करण्यात येणार आहेत. एका विभागातून दुसर्‍या विभागात, ग्रंथालय, वसतिगृह इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी कारऐवजी कॅम्पसमध्ये चालण्याची सवय लावणे हा त्याचा उद्देश आहे. यामुळे फिटनेसलाही चालना मिळेल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: collegegood newsHigher educational institutionmuktpeethsports subjectsStudent interestsStudent Service Centeruniversityउच्च शैक्षणिक संस्थाक्रीडा विषयचांगली बातमीमहाविद्यालयमुक्तपीठविद्यापीठविद्यार्थी सर्व्हिस सेंटरविद्यार्थी हित
Previous Post

कोल्हापूरमध्ये शिवजयंतीचा जल्लोष, अष्टदिशा दणाणल्या शिवघोषानं सारं भगवंमय!

Next Post

उघडली गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कवाडं! निघाली यमुनोत्री मातेचीही पालखी!!

Next Post
Gangotri-Yamunotri

उघडली गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कवाडं! निघाली यमुनोत्री मातेचीही पालखी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!