Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मसाल्यांची निर्यात दुप्पट करून १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य!

February 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Indian spices

मुक्तपीठ टीम

प्राचिन काळापासून भारत ओळखला जातो तो सोनं आणि मसाल्यांसाठी. आताही जगभरात भारतीय मसाल्यांची खवय्यांमध्ये क्रेझ आहे. भारतातून शतकानुशतके होणारी मसाल्याच्या पदार्थांची आयात हा एक मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. आता ही आयात अधिक वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी आज येत्या पाच वर्षात या मसाल्यांची निर्यात दुप्पट करून १० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आवाहन मसाले उद्योग क्षेत्राला केले आहे.

 

”आपण आता मसाल्यांच्या निर्यातीचे १० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट २०३० पर्यंत पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगली आहे – मात्र कदाचित त्याहूनही जलद, हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षांत आपण गाठू शकतो का? आगामी पाच वर्षांत २०२७ पर्यंत आपण आपली निर्यात दुप्पट करून १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांत आपली निर्यात १० अब्ज डॉलर्सच्या दुप्पट करण्याची आकांक्षा बाळगूया” ,असे गोयल यांनी मसाले मंडळाच्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना सांगितले.

 

२०१४-२१ मध्ये मसाल्यांच्या निर्यातीत ११५% आणि मूल्यात (अमेरिकी डॉलर्स) ८४% वाढ झाली असून, २०२०-२१ मध्ये ही निर्यात ४.२ अब्ज डॉलर्स इतक्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केले. “आता, भारतीय मसाले आणि मसाले उत्पादने जगभरातील १८० हून अधिक ठिकाणी पोहोचत आहेत,” असे ते म्हणाले.

 

”कोरोनाच्या काळात भारताची औषधे आणि लसींसोबतच जगाने आपल्या मसाले आणि काढ्याचे महत्त्व अनुभवले.” असे गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून सांगितले.

 

हळदी दूध/हळद लट्टे हे आपल्या आजीचे घरगुती उपाय आणि दालचिनी, तुळस (तुळशीची पाने) इ. मसाले हे आता जगातील मुख्य घरगुती पदार्थ बनले आहेत. किंबहुना, भारताने गेल्या वर्षी हळदीच्या निर्यातीत ४२% वाढ नोंदवली,” असे गोयल यांनी सांगितले.

 

जागतिक मसाले क्षेत्रात भारत आघाडीवर असला तरी या क्षेत्रालाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे गोयल म्हणाले. ”अन्न सुरक्षा, गुणवत्ता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असताना, जगभरातील विविध ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उच्च श्रेणी मूल्यवर्धन आणि नवीन उत्पादनाच्या विकासावर भर देऊन भारतीय मसाले उद्योगाची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे”, असे त्यांनी सांगितले.

 

सरकार लवचिक आणि कार्यक्षम कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे देशातून मसाल्यांची निर्यात वाढवण्यासाठी उत्सुक आहे, असे गोयल म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान गोयल यांनी ,वेलची उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, मसाले मंडळ आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या, हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा योजनेचा प्रारंभ केला. मसाले मंडळाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी टपाल तिकिटाचे प्रकाशनही केले. सरकारने मसाल्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून भारताची निर्यात वाढवण्याचा आणि विस्तारण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

 

सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेसाठी नाव कमावण्याच्या अनुषंगाने , भारतातील सर्व प्रदेशांमध्ये गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्याचे आणि सर्वोच्च मानकांचे पालन करण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले मंडळाला केले.

 

मसाले हे भारतीय खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीचा एक भाग आहेत, असे ते म्हणाले. वर्षानुवर्षे , भारत हा जगातील मसाल्यांचे आगर आहे. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक आणि ग्राहकही आहे. केरळमधील काळी मिरी, गुजरातचे आले आणि ईशान्येकडील नागा मिरची यांसह काश्मीरमधील केशर जगप्रसिद्ध आहे, असे गोयल यांनी सांगितले.

 

मसाल्याच्या विविध उत्पादनांसाठी भौगोलिक निर्देशांक टॅग मिळवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले उद्योग क्षेत्राला केले. मसाले आणि मसाल्यांच्या उत्पादनांचे आघाडीचे उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार म्हणून तसेच मसाल्यांची प्रक्रिया आणि मूल्यवर्धनात जागतिक केंद्र म्हणून.गेल्या काही वर्षात भारताने जागतिक मसाले क्षेत्रात सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे, असे गोयल यांनी सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: central GovernmentExports of spicesgood newsIndian spicesmuktpeethUnion Commerce Minister Piyush Goyalकेंद्र सरकारकेंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयलचांगली बातमीभारतीय मसालेमसाल्यांची निर्यातमुक्तपीठ
Previous Post

आयआयटी मुंबईमध्ये नव्या दोन लॅब्ससाठी माजी विद्यार्थी राज नायर निधी पुरवणार

Next Post

गुगल मॅपवरून पैसे कमवण्याची मोठी संधी, तासाच्या हिशेबाने मिळणार पैसे!

Next Post
Google Maps

गुगल मॅपवरून पैसे कमवण्याची मोठी संधी, तासाच्या हिशेबाने मिळणार पैसे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!