Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारताच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यावरील कांदळवनाच्या काही प्रजाती कमी होत जमिनीच्या दिशेने सरकण्याची शक्यता

November 16, 2022
in featured, निसर्ग
0
Some species of Kandal forest along the east-west coast of India are likely to decline and move inland

मुक्तपीठ टीम

पर्जन्यमान आणि समुद्र स्तरावरील बदलांमुळे कांदळवनांसाठी अनुकूल अधिवासांमध्ये घट झाल्यामुळे, भारताच्या पश्चिम किनार्‍यालगतच्या चिलीका आणि सुंदरबन तसेच भारताच्या पश्चिम किनार्‍यालगत असलेल्या द्वारका आणि पोरबंदरमधील कांदळवनांच्या काही प्रजाती २०७० पर्यंत कमी होण्याची आणि जमिनीकडे सरकण्याची शक्यता आहे, एका अनुमान पद्धतीवर आधारित अभ्यासातून हे समोर आले आहे. हा अभ्यास संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी अत्यंत योग्य क्षेत्रे निश्चित करण्यासाठी आणि भविष्यासाठी संवर्धन धोरण विकसित करण्याच्या अनुषंगाने सहाय्य्यकारी ठरू शकतो.

कांदळवने ही अनेक परिसंस्थांना सहाय्य्यकारी आहेत  आणि किनारपट्टीवरील पर्यावरणीय धोका  कमी करण्यास मदत करतात, मात्र तरीही हवामान बदल, समुद्र स्तरावरील स्थितीत चढउतार आणि मानवी उपक्रमांमुळे अत्यंत  धोक्यात असलेल्या परिसंस्थांपैकी कांदळवने ही एक असून ती वेगाने कमी होत आहेत. कांदळवनांचे स्थानिक वर्गीकरण आणि प्रजातींच्या अधिवासाच्या गरजेविषयी मर्यादित समज यामुळे भारताच्या किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये राबवण्यात आलेलया संवर्धन उपक्रमांचे यश कमी झाले आहे. हे विशेषतः भारताच्या किनारपट्टीलगत समृद्ध कांदळवन जैवविविधता असलेल्या प्रदेशात, स्थानिक -कालमर्यादेच्या  प्रमाणात  संवर्धन उद्दिष्ट क्षेत्र ओळखण्यासाठी मॉडेल-आधारित अभ्यास करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत (डीएसटी) स्वायत्त संस्था असलेल्या बीएसआयपी मधील शास्त्रज्ञांनी दोन कांदळवनांच्या प्रजातींचा भूतकाळातील आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याचा अंदाज घेण्यासाठी इंसेम्बल (Ensemble) प्रजाती वर्गीकरण मॉडेलचा वापर केला.

या अभ्यासात त्यांना भविष्यात, पर्जन्यमान आणि समुद्र स्तरावरील  बदलांना  प्रतिसाद देताना  भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर, त्या अनुरूप अधिवासांमध्ये घट झाल्यामुळे  भविष्यात (2070 पर्यंत) कांदळवनांच्या प्रजातींमध्ये लक्षणीय घट होऊन ती जमिनीकडे स्थलांतर होतील असे निष्कर्ष आढळून आले. किनारपट्टीच्या पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी आणि भारताच्या किनारपट्टीलगतच्या किनारी वनस्पतींवर होणारा हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने निश्चित करण्यात आलेल्या मुख्य ठिकाणांवरील समस्यांवर मात करण्याच्या  आणि जुळवून घेण्यासंदर्भातील धोरणांच्या अंमलबजावणीसाठी हे निष्कर्ष उपयुक्त ठरतील.

भारताची किनारपट्टी ही हवामान आणि समुद्रपातळीतील बदलांचा सहज परिणाम होणारी आहे, आणि किनार्‍यावरील पाणथळ प्रदेशातील प्रजातींच्या अनुमान  आणि व्यवस्थापनासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत,तसेच त्यांच्या भविष्यातील अधिवासाच्या मॅपिंगसाठी मर्यादित संशोधन करण्यात आले. ही पोकळी भरून काढण्यासाठी, या अभ्यासाने, किनारपट्टीच्या पाणथळ जागेतील प्रजाती असलेल्या कांदळवनांवर हवामान बदलाचा संभाव्य परिणाम मांडण्याच्या प्रयत्न केला आहे.

या संरक्षित क्षेत्रांमध्ये प्रभावी राखीव क्षेत्र (बफर झोन) निर्माण केल्याने मुख्य संरक्षित क्षेत्रावरील, संरक्षित क्षेत्र नसलेल्या क्षेत्राचा प्रभाव कमी होऊ शकतो त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्याने या कांदळवनांच्या  प्रजातींच्या वाढीसाठी काही क्षेत्रे अत्यंत अनुरूप अशा  प्रदेशात परिवर्तीत होऊ शकतात, असे इकोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या या अध्ययनात सुचवण्यात आले आहे.

प्रकाशनाचा तपशील: https://doi.org/10.1016/j.ecoinf.2022.101819

Map showing the Current and future distribution of suitable habitat (2070) under extreme global warming scenario for Rhizophora mucronata
Map showing the Current and future distribution of suitable habitat (2070) under extreme global warming scenario for Avicennia officinalis

Tags: IndiaInlandMangrove Forestकांदळवनभारत
Previous Post

Twitter, Facebook Meta, Microsoft आणि आता Amazonही! कर्मचारी कपात का?

Next Post

आदिपुरुष वाद: रावणाची दाढी काढण्यासाठी ३० कोटींचा खर्च! ६ महिन्यांचा वेळ!

Next Post
Adipurush Films

आदिपुरुष वाद: रावणाची दाढी काढण्यासाठी ३० कोटींचा खर्च! ६ महिन्यांचा वेळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!