मुक्तपीठ टीम
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तिरुपतीला जाणारी एक खास रेल्वेगाडी पुन्हा सुरू केली आहे. तसेच कोल्हापूर ते मुंबई दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे भाविकांना सुरक्षेसह प्रवास करता येणार आहे. मात्र, कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
तिरुपती-आदिलाबाद विशेष ट्रेन २७ जानेवारीपासून पहाटे ५:५० वाजेच्या सुमारास सुटेल. २८ जानेवारीपासून तिरुपतीवरून ही ट्रेन दररोज रात्री ९:०५ वाजता सुटेल. तर महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी १ फेब्रुवारीला कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनस येथून पुन्हा सुरू होईल आणि दुसर्या दिवशी मुंबईला पोहोचेल.
दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नांदेड विभागातील तिरुपतीकडे जाणाऱ्या रेल्वे स्थानकांपैकी उमरी, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग आणि किनवट ही आहेत. सर्व विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित गाड्या आहेत. कोणत्याही प्रवाशांना तिकिट काढल्याशिवाय रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर रिझर्व्हेशन काउंटर आहेत.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनीही याबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले, पूर्वी ट्रेनमध्ये २१ डबे होते, आता यात १८ डबे असतील, ज्यात दहा जनरल कोचचा देखील समावेश असेल. हे कोच पुढील काळात प्रवाशांच्या संख्येनुसार वाढविण्यात येतील. ट्रेन सेवेसाठी ऑनलाइन बुकिंग २५ जानेवारी रोजी पुन्हा सुरू होईल आणि कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
पाहा व्हिडीओ: