मुक्तपीठ टीम
भारतातील एसयूव्ही सेगमेंटचे प्रणेते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपला महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड स्कॉर्पिओचा नवीन अवतार असलेल्या स्कॉर्पिओ क्लासिकच्या किमती जाहीर केल्या. नवीन डिझाइन, समकालीन इंटिरियर्स, अंगभूत तंत्रज्ञान आणि नवीन शक्तिशाली इंजिनसह मजबूत आणि अस्सल एसयूव्ही अशा अनेक वैशिष्ट्यांसह क्लासिक एस आणि क्लासिक एस ११ या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल आणि ११.९९ लाख रुपयांपासून पुढे ( एक्स-शोरूम) प्रास्ताविक किमतीत उपलब्ध आहे.
स्कॉर्पिओ ब्रँड ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काळाच्या ओघात विकसित झाला आहे आणि मजबूत, शक्तीशाली आणि सक्षम ‘अस्सल SUV’ शोधत असलेल्या उत्साही ग्राहकांमध्ये लोकप्रिय पर्याय राहिला आहे स्कॉर्पिओ क्लासिक त्याचे उत्कृष्ट डिझाइन, अविस्मरणीय स्थान आणि शक्तिशाली कामगिरीचे प्रदर्शन करत राहील. स्कॉर्पिओ क्लासिकच्या प्रकारानुसार किंमती खालीलप्रमाणे आहेत:
प्रकार | डिझेल एमटी (एक्स-शोरूम) |
क्लासिक एस | ११.९९लाख रुपये |
क्लासिक एस ११ | १५.४९लाख रुपये |
मस्क्यूलर बोनेटसह नवीन ठळक लोखंडी जाळी आणि नवीन ट्विन-पीक्स लोगो द्वारे वेगळेपणा जपत मूळ स्वरूपाचे आकर्षण वाढवणारे, स्कॉर्पिओ क्लासिक उत्कृष्ट कामगिरी दर्शवते. सर्व-अॅल्युमिनियम लाइटवेट GEN-2 mHawk इंजिनद्वारे समर्थित, तब्बल ९७ kW (१३२ PS) पॉवर आणि ३०० Nm टॉर्क यात आहे. ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये एक नवीन सहा-स्पीड केबल शिफ्ट सादर करण्यात आली आहे. उत्तम राइड आणि हाताळणी देण्यासाठी MTV-CL तंत्रज्ञानाने सस्पेन्शन सेट-अप वाढवण्यात आला आहे. सुलभ चालना आणि नियंत्रणासाठी सुकाणू प्रणालीमध्ये लक्षणीय प्रगती केली गेली आहे.
प्रीमियम भागाला पुढील स्तरावर नेऊन, स्कॉर्पिओ क्लासिक नवीन टू-टोन बेज आणि ब्लॅक इंटीरियर थीम, क्लासिक वुड पॅटर्न कन्सोल आणि प्रीमियम क्विल्टेड अपहोल्स्ट्रीसह येत आहे. या वाहनात फोन मिररिंग आणि इतर आधुनिक कार्यक्षमतेसह नवीन २२.८६ सेमी टचस्क्रीन इंफोटेनमेंट यंत्रणा देखील आहे. रेड रेज, नेपोली ब्लॅक, डीसॅट सिल्व्हर, पर्ल व्हाईट आणि नव्याने सादर केलेला गॅलेक्सी ग्रे अशा पाच बॉडी कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असून १२ ऑगस्ट २०२२ पासून ग्राहकांना एक्सप्लोर करण्यासाठी आणि चाचणी घेण्यासाठी महिंद्राच्या डीलरशिपवर उपलब्ध आहे. या वर्षी जूनमध्ये सादर झालेल्या ऑल-न्यू स्कॉर्पिओ-एन सोबत स्कॉर्पिओ क्लासिक ची विक्री होईल.
प्रकारानुसार वैशिष्ट्य सूची
क्लासिक एस | क्लासिक एस ११ |
· एलईडी टेल लॅम्प्स
· दुसरी रांग एसी व्हेंट्स · हायड्रोलिक असिस्टेड बोनेट · बोनेट स्कूप · ड्युअल एअरबॅग्ज · मायक्रो हायब्रिड टेक · इंटेलिपार्क |
क्लासिक एस पेक्षा अधिक
· 22.86 सेमी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट · एलईडी आयब्रोज · डीआरएल · स्पॉइलेर · डायमंड कट अलॉय व्हील्स · पुढील आसनांना आर्म रेस्ट |
स्कॉर्पिओ क्लासिक साठीचे सोशल मिडिया अॅड्रेसेस
- ब्रॅंड वेबसाईट: https://auto.mahindra.com/suv/scorpio
- ट्विटर: @MahindraScorpio
- यूट्यूब: youtube.com/mahindrascorpio
- इंस्टाग्राम: @mahindra.scorpio.official
- फेसबुक:@MahindraScorpio
- हॅशटॅग: #ScorpioClassic
About Mahindra
Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federation of companies with 260,000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality, and real estate.
The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, with a goal to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to Rise.
Learn more about Mahindra on www.mahindra.com / Twitter and Facebook: @MahindraRise/ For updates subscribe to https://www.mahindra.com/news-room.