मुक्तपीठ टीम
लाइफसेल या कम्युनिटी स्टेम सेल बँकिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने नुकतेच त्यांच्या समुदाय बँकिंग सदस्यांसाठी अनोखी सेवा ‘स्टेममॅच’च्या लाँचची घोषणा केली. सक्रिय आरोग्यसेवा देण्याच्या कटिबद्धतेशी बांधील राहत स्टेममॅच आता भारतीय ओरिजिन स्टेम सेल्सचे भंडार लाइफसेल रजिस्ट्रीमध्ये लहान मूल व कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या जुळणाऱ्या स्टेम सेल युनिट्सची अचूक संख्या व प्रमाणाबाबत माहिती देईल.
प्रत्यारोपणाचे यश दाता व प्राप्तकर्त्यादरम्यान रक्त जुळण्यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते, जे एचएलए किंवा ह्युमन ल्यूकोसाइट अॅण्टीजन मेकर्सद्वारे निर्धारित केले जाते. यशस्वी ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी ८ पैकी किमान ६ एचएलए मार्कर्स (जवळपास ७५ टक्के मॅच) दाता व प्राप्तकर्त्यादरम्यान जुळणे आवश्यक आहेत. पण भारतातील आनुवांशिक विविधता पाहता योग्य मॅच मिळण्याची शक्यता १०,००० व्यक्तींमध्ये १ ते २,०००,००० व्यक्तींमध्ये १ पर्यंत आहे.
स्टेममॅच दरवर्षी लाइफसेलच्या रजिस्ट्रीमध्ये लहान मूल व कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या ६/८, ७/८, ८/८ मॅचिंग स्टेम सेल युनिट्सच्या अचूक संख्येची माहिती देते. समुदायातील सदस्य नोंदणीच्या वेळी किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये सहजपणे स्टेममॅचचा लाभ घेऊ शकतात. तसेच वार्षिक अद्ययावत अहवाल खात्री देतो की, समुदायातील सदस्यांना उपलब्ध नवीन मॅचिंग युनिट्सबाबत योग्य माहिती दिली जाते. म्हणूनच, स्टेममॅच महत्त्वपूर्ण चाचणी व मॅचिंग करण्याचा वेळ कमी करत प्रत्यारोपण प्रक्रिया सुलभ करते. तसेच स्टेममॅच सदस्यांना गरजेच्या वेळी मॅचिंग युनिट्स उपलब्ध असण्याचा विश्वास व हमी देते.
ही मॅचमेकिंग सेवा आतापर्यंत फक्त त्वरित प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांसाठीच आरक्षित होती. त्वरित प्रत्यारोपणाची गरज नसलेल्या पालकांना आता सक्रियपणे मॅचिंग युनिट्सचा शोध घेण्याची ही सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लाइफसेलला या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रगत ऑटोमेशन्समध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे, कारण या सेवेसाठी मागणीमध्ये अपवादात्मकरित्या वाढ होईल.
स्टेममॅचच्या लाँचबाबत बोलताना लाइफसेलचे व्यवस्थापकीय संचालक मयूर अभया म्हणाले की, ”लाइफसेल प्रत्येक भारतीयाला नाविन्यपूर्ण, जीवनदायी स्टेम सेल-आधारित थेरपीज उपलब्ध करून देण्यामध्ये साह्यभूत राहिली आहे आणि नुकतेच भारताच्या पहिल्या कम्युनिटी ड्युअल कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लाण्टला मिळालेल्या यशामधून आमच्या आत्मविश्वासालानचालना मिळाली आहे. रजिस्ट्रीमधील कम्युनिटी बँकिंगमध्ये आमच्या प्रयत्नांमध्ये वाढ करत ५०,००० हून अधिक पात्र व मान्यताप्राप्त कॉर्ड ब्लड युनिट्स भारतीय रूग्णाला योग्य मॅच मिळण्याची ९७ टक्क्यांहून अधिक खात्री देते. स्टेममॅचचे नवीन लाँच कुटुंबांना लाइफसेलसोबतच्या त्यांच्या प्रवासामध्ये कोणत्याही टप्प्यावर जगातील सर्वात मोठ्या भारतीय ओरिजिन स्टेम सेल्सच्या भंडारामध्ये उपलब्ध असलेल्या मॅचिंग कॉर्ड ब्लड युनिट्सची अचूक संख्या व प्रमाण समजण्याचा आत्मविश्वास व समाधान देईल. तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत अचूक माहिती उपलब्ध असताना ही संधी का सोडावी.”