मुक्तपीठ टीम
रायपूरहून औरंगाबादला जाणारा खाद्यतेलाचा टँकर गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत, सौदार गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर उलटला. गुरुवार २ डिसेंबर रोजी सांयकाळी ही घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी खाद्यतेल रस्त्यावर सांडले आहे. ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी घटना ठिकाणी धाव घेतली आणि तेल लुटले.
जेव्हा हा खाद्यतेलाचा टँकर उलटला तेव्हा फुटाडा, सौदूर या गावांतील नागरिकांना समजताच त्यांनी घरातून भांडी घेऊन खाद्य तेल लुटण्यासाठी गर्दी केली. या घटनेमुळे गोंधळ उडाला होता, या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची माहिती डुग्गीपार पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली व गावकऱ्यांचा जमाव घटनास्थळावरून हटवून टँकर उचलून सरळ करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली, मात्र तोपर्यंत बहुतांश तेल लुटले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर क्रमांक CG-08/ AM २३४७ खाद्यतेलाने भरलेला, छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून औरंगाबादकडे भरून शुद्धीकरणासाठी जात होता. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर मात्र सौद गावापूर्वी २ किमी अंतरावर असलेल्या चुलबंद नदीच्या पुलाजवळ टँकर चालकाने स्टेअरिंग वळवले, मात्र त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि सोयाबीन कच्च्या तेलाने भरलेला टँकर मध्यंतरी उलटला.
आणि रस्त्यावर तेल सांडले आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी संधी साधत तेल लुटले. मात्र, पोलिस अपघाताचे कारण आणि कारण तपासत आहेत.