मुक्तपीठ टीम
ओमिक्रॉन या कोरोच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेक देशांनी यासाठी कठोर पाऊलंही उचलली आहे. भारतातही केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या एका डॉक्टरांने या व्हेरिएंटची लक्षणे सांगितली आहेत.
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, तिने गेल्या १० दिवसांत या प्रकाराची लागण झालेले ३० रुग्ण पाहिले आहेत, ज्यात लक्षणे वेगळी होती. रुग्णांसाठी हे सर्व असामान्य होते. आफ्रिकेतील अनेक रुग्णांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय होता, त्यापैकी काहींना सौम्य आढळली असून ते रुग्णालयात न जाता बरे ही झाले आहेत.
ही आहेत लक्षणे
- कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटबाबत एएफपीशी केलेल्या संभाषणात डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये अती थकवा, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला अशी लक्षणे दिसून येते.
- काही रुग्णांमध्ये तापमान थोडे जास्त होते.
- कोएत्झी यांनी आरोग्य अधिकार्यांना सतर्क केले होते की देशातील कोरोनाचे सध्याचे चित्र डेल्टा या जुन्या व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
कोरोना झालेल्यांपैकी बहुतेक ४० वर्षाखालील पुरुष
- कोएत्झी म्हणाले, ” आत्तापर्यंत ज्या रुग्णांना लसीकरण केले गेले नाही अशा रूग्णांमध्ये देखील सौम्य लक्षणे आहेत.”
- युरोपमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना आधीच संसर्ग झाला आहे.
- कोएत्झीने उपचार केलेले बहुतेक रुग्ण हे ४० वर्षांखालील पुरुष आणि त्यापैकी निम्म्याहून कमी लोकांचे लसीकरणही झाले नव्हते.
द. आफ्रिकेची निंदा
- कोएत्झी म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिकेची खूप निंदा झाली.
- परिणामी, अनेक देशांनी देशातील प्रवाशांवर संपूर्ण प्रवास निर्बंध लादले आहे.
- दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च आरोग्य महासंघाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.