मुक्तपीठ टीम
कोरोना काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावलेला अभिनेता सोनू सूद हा महानायक बनला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनू सूद गरजूंना ऑक्सिजन, बेड्स आणि औषधे उपलब्ध करून देत आहेत. काही आठवड्यांपूर्वी सोनू सूदने आश्वासन दिले होते की तो परदेशातून ऑक्सिजन प्लांट मागवत आहेत जे देशभरात स्थापित केले जाईल. नेल्लोर येथे पहिला ऑक्सिजन प्लांट बसविला आहे. हा प्लांटच्या स्वागत करताना स्थानिक लोकांनी रस्त्यावर उतरून सोनू सूद यांच्या सत्कार्याचे कौतुक केले. .
देशात उभारण्यात येणाऱ्या १६ प्लांटपैकी उर्वरित प्लांट तमिळनाडू, पंजाब, उत्तराखंड, टीएस, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उभारले जाणार आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना सोनूने लिहिले, “नेल्लोरचे या दिलदार स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. मला खात्री आहे की आम्ही पाठविलेले ऑक्सिजन प्लांट अनेक मौल्यवान जीव वाचविण्यात मदत करेल. ऑक्सिजन प्लांट इतर राज्यात पाठविली जात आहेत. जय हिंद, मिशन हॉस्पिटल ऑक्सिजन.”
ऑक्सिजन प्लांट इंस्टॉलेशन मोहिमेविषयी बोलताना सोनू सूद म्हणाले, “नेल्लोरमधील सरकारी रुग्णालयात पहिला ऑक्सिजन प्लांट बसविला गेल्याचा मला आनंद झाला. आम्हाला मदत केल्याबद्दल स्थानिक लोक आणि तेथील डॉक्टरांचे खूप आभार. आता ऑक्सिजन प्लांट लावण्याची मोहीम सुरू झाली आहे. अजून बरेच येणार आहेत. त्यांची स्थापना देशातील बर्याच राज्यात केली जाईल. सकारात्मक रहा. जय हिंद. ”
चाहत्यांनाही आवाहन
कोरोनाच्या दुसर्या लाटे दरम्यान ऑक्सिजनच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे सोनूच्या मनात ही कल्पना आली. सोनूने आपल्या चाहत्यांना असेही आवाहन केले होते की, ज्या ठिकाणी गरिबांवर मोफत उपचार केले जातात अशा रुग्णालयात हे प्लांट लावण्याचा प्रयत्न करा. काय माहित आपल्या हातात कोणाचा जीव वाचवणे लिहिले असेल.