मुक्तपीठ टीम
भाजप नेता आणि बिग बॉसमध्ये झळकणाऱ्या सोनाली फोगाटच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन सत्य उघड होत आहेत. चौकशीदरम्यान या प्रकरणात ड्रग्ज विक्रेत्यांचे कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्याचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. सोनालीला एका बाटलीत १.५ ग्रॅम एमडीएमए टाकून ड्रग्ज देण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगाट प्रकरणाशी संबंधित अहवाल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “त्यांच्या सरकारने भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित हत्येच्या चौकशीशी संबंधित ‘गोपनीय अहवाल’ हरियाणाचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना सादर केला आहे. तपासात काही लोकांचे जबाब नोंदवण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक हरियाणाला रवाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.”
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण संशयास्पद!
- सोनाली फोगाटचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
- ४३ वर्षीय सोनाली फोगाट ही टिकटॉक स्टार आणि रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’ ची स्पर्धक होती, जी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील होती.
- सोनाली फोगाटचा २२-२३ ऑगस्टच्या मध्यरात्री गोव्यात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
- मृत्यूच्या दोन दिवस आधी ती तिच्या दोन पुरुष साथीदारांसह गोव्यात पोहोचली होती.
- तिच्या कथित हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्या दोन साथीदारांसह एकूण पाच जणांना अटक केली आहे.
- या प्रकरणाची चौकशी आता पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
- सोनाली फोगाट खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिच्या दोन साथीदारांसह – सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या पाच जणांना अटक केली आहे. सुधीर आणि सुखविंदर हे सोनाली फोगटसोबत गोव्यात आले होतो.