मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यामुळे केवळ महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या संसदीय लोकशाहीत एक नवा इतिहास घडला आहे. एकाच वेळी विधानसभा-विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष-सभापतीपदी जावई-सासरे यांची जोडी आली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.
विधिमंडळात आता सासरे-जावयांचं राज्य!
- भाजपातर्फे दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून अॅड राहुल नार्वेकर हे निवडून आले आहेत.
- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाली.
- रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
- ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
- रामराजे नाईक-निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत.
- त्यांचा संसदीय कार्यपद्धतीचा गाढा अभ्यास आणि अनुभव आहे.
- राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत.