मुक्तपीठ टीम
या कोरोना संकट काळात पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम करायची वेळ सर्वांवर आली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानापासून आपल्या स्वतःच्या वागण्यापर्यंत आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी सादर करत आहोत काही महत्वाच्या टिप्स…
‘वर्क फ्रॉम होम’ कसे करणार मस्त?
१. तुमचं लक्ष कामावर केंद्रित होण्यासाठी शांत आणि सोयीच्या जागेची निवड करा.
२. घरी काम करत असाल तरी मस्त तयार व्हा, त्यामुळे मानसिकता प्रसन्न आणि उत्साही राहील.
३. काम किती तासात पूर्ण करण्याचे त्याचे नियोजन आधीच करा, तसे कराही. ताण येणार नाही.
४. काम करताना काहीसा आराम आवश्यक, स्वत: साठी ब्रेक टाईम ठरवा.
५. टेबलजवळ व्हाइट बोर्ड किंवा डायरी ठेवा. त्यात नोंद करत राहा.
६. ऑनलाइन मीटिंगपूर्वी प्रेझेंटेशन, रिपोर्ट इतरांशी शेअर करा, तुमचे मुद्दे सर्वांना कळतील.
७. वेळोवेळी आपल्या सिस्टममधील अँटीव्हायरस प्रोग्राम्स, फायरवॉल, मालवेयर नेहमी तपासा.
८. लॅपटॉप तुमच्या डोळ्यापासून योग्य अंतरावर ठेवा. योग्य पद्धतीनेच बसा.
९. फोन कॉलवर बोलताना चाला, त्यामुळे जागेवरून उठण्याची संधी मिळेल.
१०. दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्या. जेवण, नाश्ता योग्य वेळी करा.
१०. दर दोन तासांनी पाच किंवा दोन मिनिटे मान, खांदा आणि पाठ स्ट्रेच करा.
१२. कामाच्या वेळी घरातील आवाजही ऐकू येत राहणार, त्याने अस्वस्थ होऊ नका.
१३. कामादरम्यान काही करणं शक्य झालं नाही तर निराश होऊ नका. उत्साही राहा.
१४. सर्वात महत्वाचं, तुम्ही निरोगी राहिलात तर आणखी चांगलं काम कराल, हे लक्षात ठेवा.