मुक्तपीठ टीम
देशात लसीकरण मोहिमेला आता तीन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. तरीही आजही लसीकरणाबद्दल अनेकांच्या मनात शंका-कुशंका कायम आहेत. काही असेही आहेत ज्यांना लस घेतल्यानंतर संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाबद्दल बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघड वाटणाऱ्या या प्रश्नांची अगदी सोपी उत्तरे मांडत आहोत.
१.प्रश्न-
दोन्ही डोसचे निश्चित वेळापत्रक काय आहे?
उत्तर-
पहिल्या डोसपासून आठव्या आठवड्यापर्यंत डॉक्टरांनी सांगतल्याप्रमाणे.
२. प्रश्न-
कोरोना लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा?
उत्तर-
दुसऱ्या डोससाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी. डोस वेळेवर घेतल्यास अॅन्टीबॉडीज तयार होतात.
३. प्रश्न-
पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास काय करावे?
उत्तर-
संसर्गानं घाबरू नका. संसर्गानंतर कोणतीही लक्षणे नसल्यास, दुसरा डोस दीड ते दोन महिन्यांपर्यंत दिला जाऊ शकतो.
४. प्रश्न-
दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढेल?
उत्तर-
पहिल्या डोसमुळे ६० टक्के प्रतिकारशक्ती. दुसरा डोस ८०% प्रतिकारशक्ती विकसित करतो.
५. प्रश्न-
एक डोस कोविशिल्डचा आणि दुसरा कोवाक्सिनचा मिळू शकतो का?
उत्तर-
नाही, पहिला डोस ज्या लसीचा तिचाच दुसरा. दोन्ही लसींची कार्यप्रणाली वेगळी आहे.
६. प्रश्न-
दुसर्या डोससाठी वेळ मिळत नसल्यास काय करावे?
उत्तर-
पहिला डोस झाला की दुसर्या डोसचा स्लॉट मिळतोच. तुम्हाला मोबाइलवप मॅसेजही येतो.
७. प्रश्न-
एका लसीचे दोन्ही डोसनंतर दुसरीही लस घेता येईल?
उत्तर-
दोन्ही लसी एका वर्षासाठी प्रभावी ठरतात. एक वर्षानंतर समान कार्य करणारी दुसरी लस निवडू शकता.
८. प्रश्न-
लसीचा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास काय?
उत्तर-
लसीचा डोस वाया जात नाही. उलट लढण्याची क्षमता वाढते. संसर्ग झालाच तर लवकर बरे व्हाल.
९. प्रश्न-
स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान लस घेऊ शकतात?
उत्तर-
होय, महिलांच्या मासिक पाळीचा लसीशी काहीही संबंध नाही.
१०. प्रश्न-
लस घेतल्यानंतर व्यायाम करता येतो का?
उत्तर-
लस घेतल्यानंतरच्या किरकोळ ताप, वेदना शक्य. त्यातून बरे झाल्यानंतर व्यायाम करू शकता.
पाहा व्हिडीओ: