मुक्तपीठ टीम
गुगलने १९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या ‘गुगल फॉर इंडिया २०२२’ कार्यक्रमात काही नवीन फिचर्सची घोषणा केली. कंपनी विशेषत: भारतासाठी काही नवीन सेवा सुरू करणार आहे आणि या कार्यक्रमात त्यावर चर्चा करण्यात आली. आधीच अस्तित्वात असलेल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासोबतच काही नवीन टूल्सही जारी करण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीने आपल्या अॅपमध्ये नवीन अपडेट्स आणि बदल जारी केले आहेत.
कंपनीने त्यांच्या डिजिलॉकर आणि गुगल-पे मध्ये नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर जोडले आहे. गुगल फॉर इंडियाचे ८वे एडिशन १९ डिसेंबर रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे झाले. या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. गुगल यूट्यूब निर्मात्यांच्या सहकार्याने यूट्यूब अभ्यासक्रमही सुरू करणार आहे.
गुगल-पे मध्ये नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर कसे असणार?
- गुगलने त्यांच्या कार्यक्रमात डिजिटल पेमेंट अॅप गुगल-पे साठी नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर सुरू केला आहे.
- या फिचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या व्यवहारांबद्दल जाणून घेण्यास मदत होणार आहे.
- यासोबतच यूजर्स त्यांच्या आवाजाद्वारे ट्रान्झॅक्शन पाहू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की आता गुगल-पेवर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे.
गुगलने ‘सर्च इन व्हिडीओ फीचर’ देखील आणले आहे जे स्मार्ट उपकरणांवर सर्च अॅपद्वारे व्हिडीओ शोधण्याचा पर्याय देईल. गुगल सर्चसाठी मल्टीसर्च फिचर आणण्याचा विचार करत आहे. हे यूजर्सना सहज फोटो किंवा स्क्रीनशॉट घेण्यास आणि सर्च करण्यासाठी त्यांच्या क्वेरीमध्ये मेसेज टाकण्यासाठी अनुमती देईल. गुगलने जाहीर केले की हे फिचर अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
डिजीलॉकर आणि फाइल्स लिंक होणार
- गुगलने डिजिटल डॉक्युमेंट अॅप डिजीलॉकरमधील फिचर्स वाढवले असून, गुगल शेअरिंग अॅप फायलींसाठी इंटीग्रेट केले आहे.
- यूजर्स फाईल्स अॅपद्वारे डिजिलॉकर अॅपच्या व्हेरिफाइड डिजिटल कागदपत्रांमध्ये देखील प्रवेश करू शकतात.
गुगल रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने शेतीशी संबंधित कामांमध्ये होणार मदत!
- या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला.
- पिचाई म्हणाले की, गुगल भारतातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी रिमोट सेन्सिंग क्षमता वापरत आहे.
- यासाठी कंपनीने एक मॉडेल तयार केले आहे. सध्या तेलंगणामध्ये त्याची चाचणी सुरू आहे.
- या एआय-आधारित मॉडेलच्या मदतीने, पूर यांसारख्या आपत्तींचा अंदाज लावण्यात आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल.