मुक्तपीठ टीम
मेसीची टीम बार्सिलोनाने चालू हंगामात ६ हजार ३४४ कोटी कमावले आहेत. ही कमाई रोनाल्डोच्या टीमपेक्षा ८०% जास्त असल्याचे दिसते. कोरोना संकटामुळे २०१९-२० च्या हंगामात २० मोठ्या फुटबॉल क्लबचे नुकसान झाले. मात्र, त्याला काही अपवाद होते. चालू हंगामात या मोठ्या क्लब्सचा महसूल २ हजार दशलक्ष युरो असल्याचा अंदाज आहे. स्पॅनिश क्लब बार्सिलोनाने आतापर्यंत सर्वाधिक ७१५.१ दशलक्ष युरो कमावले. लिओनेल मेसी या क्लबकडून खेळत आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोची टीम आणि इटालियन क्लब युवेन्टस यांनी ३९७.९ दशलक्ष युरो कमाईसह दहावे स्थान पटकावले आहे. त्यांची कमाई बार्सिलोनाच्या तुलनेत ८०% कमी आहे. अहवालानुसार, सर्व क्लबचे सर्वात मोठे नुकसान स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या बंदीमुळे झाले.
क्लब देश कमाई (दशलक्ष युरो मध्ये)
बार्सिलोना स्पेन ७१५.१
रियल माद्रिद स्पेन ७१४.९
बायर्न म्युनिक जर्मनी ६३४.१
मँचेस्टर युनायटेड इंग्लंड ५८०.४
लिव्हरपूल इंग्लंड ५५८.६
मॅनचेस्टर सिटी इंग्लंड ५४९.२
पीएसजी जर्मनी ५४०.६
चेल्सी इंग्लंड ४६९.७
टोटेनहॅम इंग्लंड ४४५.७
युवेन्टस इटली ३९७.९
कोरोनामुळे स्पेनमधील क्लबना सर्वाधिक फटका बसला आहे. डोमेस्टिक लिगने क्लबच्या पगारात कपात करत ६०० दशलक्ष युरोने पगार कमी केले. बार्सिलोना आणि वॅलेन्सीयाला सर्वाधिक त्रास झाला. त्याच वेळी, रिअल माद्रिदचे या हंगामातील सर्वात मोठे बजेट होते.
बार्सिलोनाने या हंगामातील सॅलेरी कॅपमध्ये जवळजवळ ३०० दशलक्ष युरो कमी केले आहेत. २०२०-२१ हंगामात त्याची सॅलरी कॅप ३८२.७ दशलक्ष यूरो आहे. जी मागील हंगामात ६७१.४ दशलक्ष युरो होती.
पाहा व्हिडीओ: