मुक्तपीठ टीम
ठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे सध्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. दरम्यान, अशीही बातमी आली होती की, जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. परंतु ही काय पहिलीच घटना नाही, याआधीही काही अभिनेत्री वादग्रस्त व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आहेत.
मोनिका बेदी
- बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मोनिका बेदीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी बरेच दिवस जोडले गेले होते.
- दोघांची लव्हस्टोरी त्यावेळी बरीच चर्चेत होती.
- अबू सालेमच्या प्रेमात मोनिका बेदी इतकी वेडी झाली की, तिने स्वतःचे संपूर्ण करिअर उध्वस्त केले. यानंतर तिला तुरुंगाची हवादेखील खावी लागली.
मंदाकिनी
- ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात आपल्या बोल्ड सीन्सने चर्चेत आलेली अभिनेत्री मंदाकिनी हिच्यावर अंडरवर्ल्ड किंग दाऊद इब्राहिमनेही हार मानली आहे. दोघेही एकदा मॅच पाहताना एकत्र दिसले होते.
- मात्र, अभिनेत्रीने प्रत्येक वेळी दाऊदसोबत संबंध असल्याचा इन्कार केला आहे.
ममता कुलकर्णी
- ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी एका ड्रग्ज स्मगलरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे.
- प्रसिद्ध ड्रग स्मगलर विकी गोस्वामीसोबतच्या चुकीच्या नात्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णीचे करिअर उद्ध्वस्त झाले होते.
- ममतानेही विकीशी लग्न केले.
- एकदा पोलिसांनी त्याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती.