मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपावर नवा आरोप केला आहे. मुंबई मनपाने कोरोना लसीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा घोटाळा लपवण्यासाठी मुंबई मनपाकडून टेंडरची मुदत वाढवण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई मनपा निवडणुकीस वर्ष राहिलेले असताना तिथं सातत्यानं सत्तेवर असलेल्या शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजपा करत असते. आताही केंद्र सरकारने राज्यांवर सोपवलेल्या १८ वर्षांवरील वयोगटातील युवावर्गाच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने थेट लसी विकत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मनपाच्या त्या पावलावरच सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामागेही घोटाळा असल्याचा त्यांचा आरोप आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप
• मुंबई मनपाने कोरोना लसींची टंचाई लक्षात घेत लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.
• विशेषत: केंद्र सरकार १८ ते ४४ वयोगटासाठी लस पुरवणार नसल्यामुळे हे टेंडर काढण्यात आले असावे.
• मुंबई मनपाने राज्य सरकारच्याही आधी असे टेंडर काढले आहे.
• सुरुवातीला या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे त्याची मुदत वाढविण्यात आली.
• मंगळवारी या टेंडरची मुदत संपत होती.
• सुरुवातीला या टेंडरच्या प्रतिसादात ३ निविदा आल्या होत्या.
• तर शेवटच्या एका तासात ५ निविदा आल्या.
• या सार्या निविदा बोगस आहेत,
• त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, असा माजी खासदार सोमय्या यांचा आरोप आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडरची मुदत वाढवून ३० जून पर्यंत पुढे नेली आहे, असाही त्यांचा दावा आहे.
• याआधीही सोमय्या यांनी रेमडेसिवीरचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
महापालिकेच्या प्रत्येक निविदा प्रक्रियेत घोटाळे होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या करत असतात. शिवसेनेनी भाजपाची साथ सोडल्यापासून सोमय्या पिसाळलेले दिसतात. भ्रश्टाचाराच्या एकही आरोपा बाबत सबळ पुरावे किरीट सोमय्या देऊ शकलेले नाहीत. सोमया, उपाध्ये, शेलार आणि भातखळकर बेछूट आरोप करण्या बाबत प्रसिद्ध आहेत. केंद्रात निरंकुश सत्ता भाजपा कडे आहे. महाराष्ट्रात पाच वर्षे सत्ता होती. महापालिकेच्या गैरव्यवहाराची चौकशी भाजपाने का केली नाही? कि आपला वाटा वाढवून घेण्यासाठी ते फक्त आरोप करतात आणि नंतर मूग गिळून गप्प बसतात?