मुक्तपीठ टीम
श्रीमद काशी ज्ञानसिंहासनदिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते तडवळ येथील व्हिपी शुगर च्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मंगलमय वातावरणात करण्यात आला. अध्यात्मिक विचाराचे आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्हि. पी. पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा कारखाना निश्चितपणे प्रगती साधेल आणि शेतकऱ्यांचे हिती जोपासले असा विश्वास जगद्गुरुनी यावेळी आपल्या आशीर्वचनातून व्यक्त केला.
शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील व्हिपी शुगर च्या २०२२- २३ या वर्षातील गळीत हंगामाचा शुभारंभ श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आणि श्री १०८ ष. ब्र. रेणुका शिवाचार्य, म्हास्वामी मुंद्रुप, श्री.म. नि. प्र शिवबसवराजेंद्र, श्री. १०८ ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य, श्री.म. नि. प्र शिवानंद शिवाचार्य, श्री. १०८ ष. ब्र श्रीकंठ शिवाचार्य, श्री. १०८ ष. ब्र शांती लिंगेश्वर महास्वामीजी, १०८ ष. ब्र नीलकंठ म्हास्वामीजी यांच्या उपस्थितीत अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आला. यावेळी जगद्गुरूंच्या असते कारखाना परिसरात माऊली अर्बन क्रेडिट सोसायटी लि सोलापूर या बँकेच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले, प्रारंभी चेअरमन व्हि पी पाटील, व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकला पाटील यांनी परमपूज्य जगद्गुरु यांची विधिवत पाद्यपूजा केली.
व्हिपी शुगर मुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – जगद्गुरु शिवाचार्य महास्वामी
याप्रसंगी बोलताना जगद्गुरु शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांनी व्हिपी शुगरने अल्पावधीत साधलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला, मागच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव दिल्याबद्दल कौतुक केले, शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी या कारखान्याच्या वतीने विविध प्रकल्प उभारण्यात येत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्याला गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले.
उच्च साखर उतारा देणाऱ्या ऊसाची लागवड करावी – ष. ब्र. रेणुका शिवाचार्य, म्हास्वामी
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त साखर उतारा देणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी, जेणेकरून साखर कारखान्याकडून आपणाला जास्तीचा भाव मिळेल असे आवाहन ष. ब्र. रेणुका शिवाचार्य, म्हास्वामी मुंद्रुप यांनी यावेळी बोलताना केले, पाटील कुटुंबीय अध्यात्मिक विचाराचे असल्यामुळे ते सर्वांच्या हिताचा विचार करीत आहेत असे सांगून व्हिपी शुगर च्या भरभराटीबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचेही जीवनमान बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
ऊस बिलापोटी पहिली उचल २२०० रुपयांची – व्हि पी पाटील यांची घोषणा
या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता म्हणून व्हिपी शुगर कडून २२०० रुपयांची उचल देण्यात येईल अशी ग्वाही चेअरमन व्हि. पी. पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. वाहतूक दरामध्ये १२.५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. मागच्या वर्षी या कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला विक्रमी भाव दिला, भविष्य काळातही ती परंपरा कायम ठेवली जाईल, कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी साखर विक्री केंद्र सुरू करण्यात येईल. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मंगल कार्यालय बांधण्यात येईल, त्याचबरोबर योग्य दरात खत मिळावा म्हणून खत विक्री केंद्रही सुरू करण्यात येईल अशा घोषणा त्यांनी याप्रसंगी केल्या, शेतकऱ्यांनी या घोषणांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शेतकरी , कर्मचारी, कामगार वाहतूक ठेकेदार यांच्या सोयीसाठी माऊली अर्बन क्रेडिट सोसायटी लि सोलापूर बँकेची स्थापना करण्यात आली असून या बँकेच्या इमारतीचे भूमिपूजनही आजच करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले,
या कार्यक्रमात मागच्या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवणारे शेतकरी किरण केसुर, शिवलिंगआप्पा अरवत, चिदानंद पाटील, तसेच जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार बसवंत उटगे, राजकुमार पाटील, दयानंद कोरे, जकाप्पा पुजारी यांचा जगतगुरूंच्या हस्ते याप्रसंगी यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार,लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक अविनाश महागावकर, जनकल्याण बँकेचे चेअरमन राजेंद्र हजारे, व्हाईस चेअरमन गोकुळ शिंदे, सौ कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक आशिष पाटील, प्रेसिडेंट धीरज शिंदे, व्हाईस प्रेसिडेंट साहेबराव पाटील, सतीश पाटील पत्रकार अनिल कापसे, जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड, मुख्य शेतकरी राजाभाऊ खटके, चीफ इंजिनियर एस आर बडवे, जनरल मॅनेजर फायनान्स एस व्ही बारबोले, चिपकेमिस्ट एस जिलानी कोजन मॅनेजर एस झगडे, उपशेती अधिकारी ए व्हि कस्तुरे, सिव्हिल इंजिनियर भोसले, ऊस विकास अधिकारी एच एम कणसे, ऊस पुरवठा अधिकारी यु एस मंगरुळे, सहाय्यक ऊस पुरवठा अधिकारी ए एस जागीरदार, स्टोअरकीपर डी. डी राठोड, ईडीपी मॅनेजर कवदे ,असिस्टंट एच आर बालाजी गरजे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर उमराणी, सुरक्षा अधिकारी रणखांब, श्रीशैल्य करजगी, बाबुराव करपे, तडवळचे सरपंच संतोष कुंभार, प्रकाश हिप्परगी, चिदानंद कुंभार, भीमाशंकर ग्वाड्याळ, गुरण्णा मुडगी, तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी, वाहन मालक, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शेतकी अधिकारी राजाभाऊ खटके केले तर शेवटी व्हा.प्रेसिडेंट साहेबराव पाटील सर्व उपस्थितांचे आभार मानले.