मुक्तपीठ टीम
छाया-प्रकाश फाऊंडेशनच्या वतीने गतवर्षाप्रमाणेच यंदाही दोन स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) अनुक्रमे एक लाख आणि रू. ७५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांनी दिली.
इच्छुक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेची संपूर्ण माहिती दहा ऑक्टोबर २०२२ पर्यंत खालील पाट्यावर पाठवावी. गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवलेल्या संस्थांनी यंदा पुन्हा प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही.
याखेरीज छाया-प्रकाश फाऊंडेशनच्या वतीने या वर्षापासून दिवंगत सुहास शहा यांच्या स्मरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील ३५ वर्षांच्या आतील कल्पक, उदयोन्मुख, उद्योजक किंवा उद्योजिकेस ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी इच्छुक,पात्र उद्योजकांनी १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपल्या व्यवसायाचा सविस्तर तपशील पाठवावा. पत्ता याप्रमाणे – छाया-प्रकाश फाऊंडेशन कार्यालय, सी-२२, नाथ प्राईड, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सोलापूर – ४१३००३. या पत्त्यावर संबंधित माहिती ही रजिस्टर पोस्ट, कुरियर किंवा स्पीड पोस्टद्वारेच पाठवावी.