मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे काही नवीन शब्द आपल्याला कळले त्यातीलच एक म्हणजे पीपीई किट. एक काळ असा होता की, पीपीई किट डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध नव्हते. आता पीपीई किटच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला आहे. त्याचे स्वदेशी उत्पादनही सुरू केले गेले आहे आणि आता ते सर्वत्र उपलब्ध आहे. पण हे पीपीई घातल्यानंतर बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः उष्णतेची समस्या भीषण आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी डोकं चालवलं. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांनी कोणत्याही हंगामात सहजतेनं वापरता येईल असं एसी पीपीई किट बनविले आहे. हे पीपीई किट घालून डॉक्टर कोरोना संक्रमित लोकांमध्ये सहज जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ह्या पीपीई किटचा पुन्हा वापर करता येईल. कोरोना रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना हे पीपीई किट ६-६ तास घालावे लागते. ज्यामुळे त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. किटच्या आत हवा पुरवठा होत नसल्याने पूर्णपणे बंद झालेले पीपीई किट उष्णता वाढवते. त्यामुळे ते किट डॉक्टरांना अत्यंत चिडचिडे करतात.
विद्यापीठाचे संचालक डॉ. डीके अग्रवाल यांनी या पीपीई किटबद्दल सांगितले की, पीपीई किट केवळ कोरोनाच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या संक्रमणादरम्यान वापरले जाऊ शकते. त्यावर बसविलेल्या उपकरणांचे वजन फक्त एक किलोग्रॅम आहे आणि सर्व पाईप्स आत स्थापित केल्या आहेत. व्यक्तीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. हे केवळ रुग्णालयातच नव्हे तर बाहेरील भागात देखील वापरले जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ: