मुक्तपीठ टीम
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेत जेवण आणि झोपही घेता येत नाही. यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अपूऱ्या झोपेमुळे शरीराचे वेळापत्रक बिघडते. त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. दरम्यान इंग्लडमधील एका विद्यापीठात झालेल्या संशोधनात हृदयविकाराचा संबंध हा व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो, असे आढळून आले आहे. रात्री १० ते ११ या वेळेत झोपले तर
हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे संशोधकांनी सांगितले आहे.तर संशोधकांनी या वेळेला गोल्डन अवर असे म्हटले आहे.
इंग्लंडमधील एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपायला गेलात तर हृदयावर याचा परिणाम होतो. मानवी झोप आणि हृदयविकाराचा संबंध असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. रात्री लवकर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
संशोधन परिणाम काय सांगतात?
- संशोधन परिणाम दर्शविते की जे रुग्ण दररोज रात्री १० ते ११ च्या दरम्यान झोपू लागले त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण कमी होते.
- त्याच वेळी, जे लोक मध्यरात्रीनंतर झोपतात त्यांना हा धोका २५ टक्क्यांपर्यंत जास्त असतो.
झोप शरीराचे वेळापत्रक बिघाडण्यापासून प्रतिबंधित करते
- युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आम्ही लोकांना प्रेरित करत आहोत की लवकर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
- संशोधक डॉ.डेव्हिड प्लेन्स म्हणतात, २४ तास शरीराचे अंतर्गत वेळापत्रक आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवते.
- याला सर्कॅडियन रिदम म्हणतात.
- उशीरा झोपेने सर्कॅडियन लय बिघडते.
- त्यामुळे त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.