Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ स्टोरीटेल मराठीची नवी ऑडिओ मालिका!”

अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि अभिनेता साईनाथ गणुवाड यांच्या आवाजात!

September 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
storytel

मुक्तपीठ टीम

गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की कमिटेड याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वाय फाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं. आजच्या तरुणाईला आपलेच वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा या एकमेकांचे घट्ट दोस्त असणारे आणि त्याच बरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे तिघेजण तुम्हाला भेटतील ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडीओ सिरीजमध्ये. या ऑडीओ सिरीजला आवाज दिला आहे गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणुवाड याने.

 

ही ऑडीओ सिरीज खास स्टोरीटेल मराठीसाठी लिहिली आहे माधवी वागेश्वरीने. या आधी देखील ‘करसाळ’ ही स्टोरीटेल मराठीसाठी पहिली मल्टी व्होईस सिरीज तिने लिहिली होती, ज्याकडे वेगळा प्रयोग म्हणून पाहिलं गेलेलं आहे.

 

‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या सिरीजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते, त्यामुळे त्या त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून उमजून घेऊन त्याच बरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.

 

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा ठोंबरे म्हणाली “जेव्हा मी ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ची संहिता ऐकली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडले. एकाच सीरिजमधल्या खूप साऱ्या पात्रांना मला आवाज द्यायचा हे समजल्यावर मी अधिकच उत्साही होते. त्या पात्रांचे व्हेरिएशन्स, त्यांच्यातील डिटेलिंग, बारीक बारीक बारकाव्यांचे निरीक्षण नोंदवून त्या व्यक्तिरेखा फुलवण्याचा मी प्रयत्न केलाय. या मालिकेत एकाचवेळी माझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी’ सुरेखा’चं पात्र वाचलंय आणि त्याचवेळी मी तिच्या आईचंही पात्र वाचलंय. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अद्भुत होत, हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतलाय. माधवी वागेश्वरीने ही मालिका फारच अप्रतिम लिहिली आहे.”

 

अभिनेता साईनाथ गणुवाड सचिन ह्या मध्यवर्ती व्यक्तिरेखे विषयी तो सांगतो “‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ ही गोष्ट ऐकूनच वाटलं की ही आजची गोष्ट आहे., गोष्टीत असणारे सुरेखा, सचिन, सायली हे आजूबाजूला बघितलेलेच वाटतात. त्यात सचिन गावाकडून पुण्यात, mpsc साठी आलेला मुलगा आहे, असे कित्येक सचिन मी जवळून पहिले आहेत, मीही त्यातलाच एक आहे. त्यामुळे त्या पात्राला जे वाटतंय ते समजून घ्यायला मदत झाली. पूजा सोबत या आधी नाटक केलं होतं, आम्ही नाटकासारखीच पूर्ण गोष्ट वाचून तालीम केली. तालमीतच आम्हाला या व्यक्तिरेखांचे आवाज आणि लकबी सापडत गेल्या”.

 

तरुण वयात आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं, आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतंच परंतु प्रेमाचं नातं म्हणलं की ते निभावण्याच्या जबाबदारीपासून मुलं पळू काढू लागतात, नात्याची जबाबदारी निभवण्याच्या थकव्यापेक्षा नात्यापासून, प्रेमापासून पळण्याचा थकवा जास्त असतो का? काय करायचं नेमकं ? असा Complicated प्रश्न मुलांना पडतो आणि नातं तर हवच, प्रेमही हवं….त्यासाठी तयारी हवी….पण नाही जमलं तर?….मध्येच डाव मोडावा वाटला तर? ..नात्यासाठी समर्पण महत्वाचं की स्वत:साठीचं उत्तरदायित्व?….काय करायचं नेमकं? ….असा Complicated प्रश्न मुलींना पडतो…

 

तुम्हालाही असेच प्रश्न पडत असतील आणि तुम्ही सिंगल असाल किंवा नसाल तरीही आवर्जून ऐका, सिंगल,committed, complicated. फक्त स्टोरीटेलवर. स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी https://www.storytel.com या वेबसाईटला भेट द्या….

 

प्रोमो डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक पहा

 


Tags: अभिनेता साईनाथ गणुवाडअभिनेत्री पूजा ठोंबरे
Previous Post

मुंबईतील कुणबी विद्यार्थी वसतीगृहासाठी ५ कोटींचा धनादेश प्रदान

Next Post

“माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरु”: नाना पटोले

Next Post
Nana Patole

"माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरु": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!