मुक्तीठ टीम
देशातील लोकप्रिय गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, केके यांनी मृत्यूआधी केलेली इन्स्ट्राग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कॉन्सर्टच्या शेवटी केके यांनी कल हम रहे न रहें कल… याद आऐंगे ये पल गाणं गायले होते. तोही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
केकेंची शेवटची पोस्ट
- गायक केके यांनी त्यांच्या शेवटच्या परफॉर्मन्सनंतरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये केके गाणे गाताना दिसत आहे. केके यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, आज रात्री विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नाझरुल मंच’च्या स्टेजवरुन गाणी सादर करतोय, तुम्हा साऱ्यांना फार प्रेम, या कॅप्शनसह त्यांनी दोन फोटो शेअर केले होते.
View this post on Instagram
दरम्यान, या कॉन्सर्टच्या शेवटी केके यांनी कल हम रहे न रहें कल… याद आऐंगे ये पल गाणं गायले होते. त्या कॉन्सर्टचे व्हिडिओ त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
केके यांचे आकस्मित निधन
- केकेच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असतानाच तो किती तंदुरुस्त होता, मग हे कसे घडू शकते, असे चाहते म्हणतात.
- केके यांना कॉन्सर्ट दरम्यानचं अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे कॉन्सर्टननंतर ते त्यांच्या हॉटेल रुममध्ये परतले.
- तिथे गेल्यावर त्यांची प्रकृती जास्तचं खालावली व ते तिथेच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
केके यांची गाजलेली गाणी
- केके यांनी १९९९ मध्ये पल हा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला होता.
- त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत.
- ज्यामध्ये तडप तडप (हम दिल दे चुके सनम, १९९९), दस बहाने (दस, २००५), आणि तूने मारी इंट्री (गुंडे, २०१४) सारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.
- केकेचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुनाथ असून त्यांचा जन्म १९६८ साली दिल्लीत झाला.
- केके यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींपासून अक्षय कुमार आणि सोनू निगम, हर्षदीप कौर आणि विशाल ददलानी यांसारख्या संगीत जगतातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.