मुक्तपीठ टीम
चीन आणि इतर ५ देशांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. भारताने २१ डिसेंबर रोजी उच्चस्तरीय बैठक घेवून त्या बैठकीत काही नियमावली ठरवली. एकीकडे कोरोनाची भीती वाढत असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांचं ट्वीट दिलासा देणारं आहे. त्यांनी चीनमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गावर आपली प्रतिक्रिया ट्वीट करत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, चीनमधील कोरोना संसर्गाशी संबंधित बातम्या चिंताजनक आहेत, परंतु भारतात घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या ट्विटमध्ये आणखी कोणते मुद्दे आहेत, ते जाणून घेवूया…
अदार पुनावालांचं कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल काय मत?
- आदर पूनावाला यांनी ट्विट करत त्यांचे मत स्पष्ट केले आहे.
- ते म्हणाले की, चीनमधून संसर्गाची वाढती प्रकरणे चिंतेची बाब आहे.
- परंतु, भारतातील मोठे लसीकरण आणि चांगले रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही.
- आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि भारत सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
- सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने INSACOG लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे.
- या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग तेथे केले जाऊ शकते.
- कोरोनाचे नवीन प्रकार विकसित झाल्यास त्याचा मागोवा घेता येईल.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसीत केली होती कोविशील्ड लस
- ऑक्टोबरमध्ये, आदर पूनावाला म्हणाले होते की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डिसेंबर २०२१ मध्ये लसीचे उत्पादन थांबवले होते.
- उपलब्ध असलेल्या लसींपैकी १०० दशलक्ष डोस कालबाह्य झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
- कोरोना महामारी दरम्यान, पुण्यात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि औषध कंपनी AstraZeneca यांच्या सहकार्याने Covishield लस विकसित केली होती.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ!
- गेल्या सात दिवसांत जगभरात कोरोनाचे ३,६३२,१०९ रुग्ण आढळले आहेत.
- जपानमध्ये १०५५५७८,
- दक्षिण कोरियामध्ये ४६०,७६६,
- फ्रान्समध्ये ३८४१८४,
- ब्राझीलमध्ये २८४, २००,
- अमेरिकेत २७२, ०७५,
- जर्मनीमध्ये २२३,२२७,
- हाँगकाँगमध्ये १०८५७७ आणि
- ताववानमध्ये १०७३८१ रुग्ण आढळले आहेत.
- जपानमध्ये गेल्या सात दिवसांत कोरोनामुळे १६७० लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
- अमेरिकेतही १६०७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
- दक्षिण कोरियामध्ये ३३५, फ्रान्समध्ये ७४७, ब्राझीलमध्ये ९७३, जर्मनीमध्ये ८६८, हाँगकाँगमध्ये २२६, तैवानमध्ये २०३, इटलीमध्ये ३९७ लोकांचा मृत्यू झाला.