मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्यांवर बोलतांना अनेक दिवसापासून मागणी करत असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयासाठी पुन्हा एकदा पाठपुरावा करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
सातार जिल्ह्यात केंद्रीय सेवामध्ये असणाऱ्यांची संख्या अधिक…
- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाने पवित्र झालेली सातारा जिल्ह्याची भूमि ही शूरवीरांची आहे.
- आजही इथले तरूण सैन्यदलात उत्स्फूर्तपणे भरती होण्यास उत्सुक आहे.
- तसेच २ जून १९६२ ला यशवंतराव चव्हाण यांनी सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना केली.
- त्यामाध्यमातून अनेकांना देशसेवेची संधी मिळाली.
- तर सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील अनेक युवक सैन्यदलात कर्तव्य बजावत आहेत.
- याशिवाय इतर केंद्रीय सेवामध्ये असणाऱ्यांची संख्या देखील जिल्ह्यात मोठी आहे.
- केंद्रीय सेवेदरम्यान बदली होत असल्याने अथवा सेवा निवृत्त झाल्यावर त्यांच्या पाल्याच्या अभ्यासक्रमात व शिक्षणात खंड पडत असतो, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये.
सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करावे, श्रीनिवास पाटलांची मागणी!
- जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणीक दृष्ट्या सोयीचे ठरणारे केंद्रीय विद्यालय सातारा जिल्ह्यात नसल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळत नाही. परिणामी अनेकांची इच्छा अपूर्ण राहते.
- जसे सातारा जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय नाही.
- तसेच ते शेजारील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही. त्यातच लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला केवळ १० विद्यार्थ्यांचीच शिफारस करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे इच्छा असूनही गरजू विद्यार्थ्यांना संधी देता येत नाही.
- सातारा जिल्ह्यातील मुलांना उत्तम पद्धतीचे शिक्षण मिळावे, केंद्रीय सेवा बजावत असणार्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
- याकरिता केंद्रीय विद्यालय व्हावे अशी माझी अनेक दिवसापासूनची मागणी आहे.
- याबद्दल पुन्हा एकदा संसदेत आवाज उठवून पाठपुरावा केला.