Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यात आरोग्य सेवा मरणपंथाला!

विवेक पंडितांच्या श्रमजीवीनं केलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या 'पोस्टमार्टेम'चा धक्कादायक अहवाल

June 7, 2022
in featured, आरोग्य
0
Vivek Pandit On health services in thane, palghar, nashik

मुक्तपीठ टीम

ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा पंचनामा केला. तेथील विदारक वास्तवाचा संघटनेने पार पोस्टमार्टेमच केले आहे. या पाहणी दौऱ्यातील माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला असून ‘मरण पावलेल्या आरोग्य व्यवस्थेचे पोस्टमार्टेम’ असे शीर्षक या अहवालाला देऊन श्रमजीवी संघटनेने आरोग्य संस्थांच्या कोलमडलेल्या अवस्थेला सर्वांसमोर आणले आहे.

गरीब सामान्य माणूस उपचारावाचून तडफडत आहे, खाजगी संस्था उपचार तर देतात मात्र महागडी बिलं अनेकांना कर्जबाजारी बनवत आहेत. हजारो कुपोषणग्रस्त बालकं, गर्भवती माता,नवजात अर्भक मृततुशय्येवर जात आहेत. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. या उलट देशात-राज्यात मंदिर,मज्जिद,भोंगा, दौरे, जात, धर्म ,पंथाचे वाद यावरच राजकारण सुरू आहे. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही गरीब सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. याबाबत श्रमजीवी संघटनेने व्यक्त केला आहे आणि आणि आरोग्य ही जीवनावश्यक सेवा प्रत्येक गरीब सामान्य रुग्णाला हक्काने मिळायलाच हवी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांना दर्जेदार मोफत उपचार मिळायलाच हवा यासाठी आता श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मे रोजी दिवसा तर ३१ मे रोजी मध्यरात्री संघटनेने वेगवेगळ्या टीम बनवून केलेल्या पंचनामा यातून समोर आलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, तब्बल १००० पेक्षा जास्त कार्यकते या कामासाठी फिरत होते. माहितीचे एकत्रीकरण करून प्रकाशित केलेला हा ‘पोस्टमार्टेम’ अहवाल म्हणजे आरोग्य संस्थेच्या मरणासन्न अवस्थेचा पोस्टमार्टेम रिपोर्टच म्हणावा लागेल.

याच प्रश्नावर येत्या ६ जून रोजी श्रमजीवी संघटनेने मोठे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन पुकारले आहे. यात मरण पावलेल्या या आरोग्य व्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिक यांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत “भगतांचा पदवीदान सोहळा” म्हणजेच पारंपरिक ‘रवाळ’ (अंगात देव घेऊन जागर करण्याचा कार्यक्रम) ठाण्यात लक्षवेधी ठरणार आहे.या अहवाल पूर्णत्वास समर्थन (अर्थसंकल्प अध्ययन केंद्र) यांनीही हातभार लावला.

या ‘पोस्टमार्टेम’ अहवालात काय आहे?

२ लाख ३४ हजार लोकांमागे फक्त १ रुग्णालय?

राज्याची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ४ ९ लाख इतकी आहे . राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची संख्या ५०३ आहे . यामध्ये खाटांची संख्या २६,८२३ आहे . राज्याची सरासरी लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०१ लोकसंख्येमागे एक रुग्णालय किंवा तब्बल ४ हजार २६४ लोकांमागे १ खाट उपलब्ध आहेत . याचा अर्थआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर काय दारुण अवस्था होईल याचा शासनाने विचार होणे गरजेचे आहे . तशी परिस्थिती आपण कोरोना काळात बघितली आहे .जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे . राज्यात प्रत्यक्षात मात्र ४ हजार २६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट उपलब्ध आहे.

राज्याच्या आरोग्य विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त

महाराष्ट्र राज्याला सक्षम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक आहे . राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग वगळता उपलब्ध असणारा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची ६२ हजार ६३४ पदे मंजूर असताना फक्त ४२ हजार ९ ० पदे भरलेली आहेत . तर २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत . म्हणजेच आजही मंजूर असलेली ३३ % पदे रिक्त आहेत . राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११ हजार ३५० पदे मंजूर असताना फक्त ९ हजार ३८६ पदे भरली असून १ हजार ९ ५५ पदे रिक्त आहेत .

ठाणे-पालघर-नाशकात ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार

ठाणे पालघर , नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष पंचनामा केलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांमध्ये आरोग्य सहाय्यक ५३ मंजूर पदांपैकी केवळ ३२ पदं भरलेली असून २१ पदं रिक्त आहेत आरोग्य सहाय्यिका ६५ मंजूर पदांपैकी ५२ पदं भरलेली असून १३ रिक्त आहेत . आरोग्य सेवकाची २४१ पदं मंजूर असून १५४ पदं भरलेली तर तब्बल ८७ पदं रिक्त आहेत तर आरोग्य सेविकेची मंजूर २ ९ ५ पदांपैकी २१० पदं भरलेली असून ८३ पदं रिक्त आहेत . जीएनएम च्या ४२ मंजूर पदांपैकी ३ ९ पदं भरलेली असून ३ पदं रिक्त आहेत . औषध निर्माता ४ ९ मंजूर पदांपैकी ३८ कार्यरत असून ११ पदं रिक्त आहेत . प्रयोग शाळा तंत्रज्ञ मंजूर ५ ९ पदांपैकी ४६ पदं भरलेली असून १३ पदं रिक्त आहेत वाहन चालक मंजूर ५ ९ पदांपैकी २२ पर्द भरलेली असून ३७ पदं रिक्त आहेत . शिपाई २३० पदं मंजूर असून ८४ पद भरलेली असुन १४७ पदं रिक्त आहेत आणि सफाई कामगारांच्या मंजूर ७५ पदांपैकी ३६ कार्यरत असून ३ ९ पदं रिक्त आहेत . म्हणजेच सर्वेक्षणातीलब एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहयाक आणि कर्मचार्याच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदं भरलेली असून ४५५ पदं रिक्त आहेत. अर्थात ३ ९ % पदं हि रिक्त असून ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरु आहे .

यांसह रात्रीच्या काळात कोणत्या आरोग्य संस्थेचा कारभार बंद होता, कुठे कुठे उपचार नाकारला, कुठे अर्भकांचा, कुठे चिमुकल्यांचा, कुठे मतांचा बळी गेला, त्याची कारणं काय याबाबतचा सविस्तर खुलासा, आरोग्यसंस्था इमारती,निवास यांची विदारक स्थिती याचा तपशील असलेला हा अहवाल खऱ्या अर्थाने आता चर्चेत यायला हवा, रोज मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या निष्पाप रुग्णांना,बालकांना, गर्भवती मातांना झालेल्या मरणयातना आता थांबायला हव्यात यासाठी श्रमजीवी आक्रमक भूमिकेत आली आहे हे मात्र निश्चित.

 

श्रमजीवी संघटना – समर्थन आरोग्य व्यवस्थेचा पोस्टमार्टेम अहवाल २०२२ – संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

श्रमजीवी संघटना – समर्थन आरोग्य व्यवस्थेचा पोस्टमार्टेम अहवाल

 


Tags: Health ServicenashikPalgharpostmartemshramjivi sanghatanathanevivek Panditआरोग्य सेवाठाणेनाशिकपालघरपोस्टमार्टेम
Previous Post

“मराठी भाषा भवन सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल” – सुभाष देसाई

Next Post

मस्क यांचा ट्विटरवर डाटा लपवत असल्याचा आरोप! खरेदी करार रद्द करण्याचा इशारा!!

Next Post
Musk vs Twitter

मस्क यांचा ट्विटरवर डाटा लपवत असल्याचा आरोप! खरेदी करार रद्द करण्याचा इशारा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!