मुक्तपीठ टीम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. वार्धक्यामुळे ते निमोनियावरील उपचारांना प्रतिसादांना प्रतिसाद देत नव्हते. रविवारी संध्याकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. सकाळी ५ वाचून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेले काही दिवस प्रकृती बरी नव्हती!
- गेल्या काही दिवसांपासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती बिघडली होती.
- बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांच्या घरात पाय घसरुन पडले होते.
- त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
- त्यांना पुण्यातील कोथरुडच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
- त्यात त्यांना निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली.
- गुरुवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
- त्यांनी वयाचं शतक पार केलं होतं.
- वार्धक्यावस्थेमुळे त्यांचं शरीर उपचारालाही प्रतिसाद देत नव्हतं.
- गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर त्यांच्यावर उपचार करत होती.
शतक महोत्सवाचे कार्यक्रमच अखेरचे!
- यावर्षी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाचा शतकमहोत्सव साजरा झाला.
- त्यानिमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या काही कार्यक्रमांना ते उपस्थित होते.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने त्यांच्या घरी जाऊन बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
- त्यानंतर बाबासाहेबांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती.
- दिवाळीनिमित्त होणाऱ्या शस्त्रपूजन कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नव्हते.
- आजवर एकही शस्त्रपूजन कार्यक्रम त्यांनी चुकवला नव्हता, यावेळी प्रथमच ते या कार्यक्रमाल हजर राहू शकले नव्हते.
बाबासाहेबांच्या शतक महोत्सवी सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवानिमित्त पुण्यात एक विशेष सोहळा संपन्न झाला.
- या सोहळ्यास ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला होता.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.
राज ठाकरेंच्या शब्दात बाबासाहेब गौरव…
- मी सहा वर्षांचा असताना पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं.
- त्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो.
- पुढे मला त्यांचा सहवास लाभला.
- बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात.
- इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात.
- इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात.
बाबासाहेब पुरंदरे…कोवळ्या वयातूनच शिवचरित्र मांडण्याचा ध्यास!
- बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे
- त्यांच्या शिवछत्रपतींवरील साहित्य सेवेमुळे त्यांना शिवशाहीर ही उपाधी मिळाली.
- पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला.
- वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी छत्रपती शिवाजी महारांजावर कथा लिहिल्या.
- या कथांचा संग्रह ‘ठिणग्या’ नावाच्या कथासंग्रहातून प्रकाशित झाला.
- पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले.
- २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली.
- बाबासाहेबांनी लिहिलेले, दिग्दर्शित आणि सादर केलेले ‘जाणता राजा’ नाटकही खूप गाजले आहे.
- या नाटकाचा हिंदीतही अनुवाद करण्यात आला आणि सादरही झाले.
- महाराष्ट्र सरकारने २०१५मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता.
- केंद्र सरकारने २०१९मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही गौरवले होते.
इतिहास घडवणारे ‘जाणता राजा’ महानाट्य!
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २० वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
- हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषात भाषांतरित केले गेले.
- ‘जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करत असत
- या महानाट्यात हत्ती घोडेही असत.
- या महानाट्याचा प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागत असे.
- महानाट्याचा प्रयोग फिरत्या रंगमंचावर होत असे.
- तो रंगमंच उभारण्यासाठी १० दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागत असत.