Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेना वर्धापनदिनी सामनानं भाजपासह अजित पवारांनाही समजवला शिवसेना धर्म?

"शिवसेनेची सत्ता आहे, पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर जिथल्या तिथे हिशेब!"

June 19, 2021
in featured, Trending, घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray both hands in action

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन आहे. दर वर्षी पाऊस कोसळत असला तरीही जल्लोशात साजरा होणारा हा दिवस गेल्या वर्षापासून कोरोना संकटामुळे साधेपणानं साजरा केला जात आहे. आजही शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी हेही जोडलेले असतील. राज्याभरातही गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. त्याचवेळी आजची सकाळ ही शिवसेनेच्या दैनिक सामनामधील डरकाळीनं झाली.

 

“महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील.” शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेला सत्ताधारी पक्षांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जाहीर सल्ला दिला होता. त्यामुळे दैनिक सामनामधून सांगण्यात आलेला शिवसेना धर्म हा भाजपाप्रमाणेच त्यांच्यासाठीही असण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेला सत्ताधर्माची जाणीव करून दिली होती!

मुंबईत शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील रस्त्यावरील राडा चांगलाच गाजला. त्यावर भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी “होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनाला सत्ताधारी पक्षाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती.

अजित पवार काय म्हणाले होते?

  • कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही.
  • आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत.
  • कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी आहे.
  • मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत.

आजच्या सामना अग्रलेखात काय आहे?

  • शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे.
  • शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह , बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो .
  • पण ‘ कोरोना ‘ महामारीने या सगळयांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे.
  • संपूर्ण देशाचीच स्थिती कोरोनामुळे गंभीर , तितकीच नाजुक बनली आहे . जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज फक्त निराशा किंवा वैफल्यच दिसत आहे . उद्योग क्षेत्राला फटका बसल्यामुळे लोकांनी मोठया प्रमाणात रोजगार गमावला आहे .
  • नोकऱ्याच गेल्याने त्याचा परिणाम शेवटी कष्टकऱ्यांच्या ‘ चुली’वर झाला . लोकांच्या चुली विझताना दिसत आहेत .
  • शिवसेनेने स्थापनेपासून लोकांच्या चुली पेटविण्याचा महायज्ञच आरंभला होता . शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत हक्काची रोजीरोटी मिळावी , त्याला सन्मानाने जगता यावे यासाठीच झाली .
  • गेल्या दीड वर्षात लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या हाच चिंतेचा आणि संकटाचा विषय बनला आहे .

 

देशाची प्रचंड मानहानी, पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला!

  • देशाचा व राज्यांचा खजिना फक्त कोरोनाशी लढण्यातच खर्ची पडला आहे . महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली .
  • अनेक लढाया पचवल्या . राजकीय , सामाजिक लढयांत असंख्य बलिदानेही दिली , पण कोरोनाची पहिली लाट , मग दुसरी लाट , आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे .
  • या लाटांनी आम्ही सगळ्यांनीच आपले आप्तस्वकीय , मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले .
  • त्या सगळया संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले , ना इतर राज्यांना करता आले . गंगेत तरंगणारी प्रेते , गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा , सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले .
  • देशाची प्रचंड मानहानी झाली . पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला .
  • तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच .

गावागावात मदतीचा हात करणे गरजेचे!

  • आज देशाची घडी अशी आहे की , ती विस्कटली आहे की सुरळीत आहे यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा गावागावांत लोकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे . शिवसेना या संकटकाळात आपल्या सेवाधर्माला जागते आहे .
  • ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मंत्राला जागत शिवसैनिकांनी खासगी रीतीने कोविड सेवा केंद्रे उभी केली . आरोग्य आणि रक्तदान शिबिरे घेतली .
  • गोरगरीबांच्या चुली बंद पडल्या तेथे मोफत अन्नधान्य पुरवठा करून महाराष्ट्र धर्माचे नाव राखले .
  • आजचा काळ असा आहे की , राजकारण , मतभेद चुलीत टाकून महाराष्ट्रासाठी सगळयांनी एकत्र येण्याचीच गरज आहे .
  • राज्यात प्रश्न अनेक आहेत . सगळय़ांत मोठा प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे . सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापूरच्छी छत्रपती शाहू महाराजांसह , युवराज संभाजी राजे , छत्रपती उदयनराजेही मैदानात उतरले आहेत.
  • त्यापाठोपाठ धनगर , ओबीसी बांधवांनीही आरक्षणासाठी शडू ठोकलेच आहेत .
  • देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे .
  • देशाचे राजकीय चित्र आज अधिकाधिक स्पष्ट होत आहे की , अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे बनत आहे ?

 

महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेस शिवसेना कदापि तडे जाऊ देणार नाही

  • अर्थात कोणी कितीही गोंधळ आणि गुंतागुंत केली तरी महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेस शिवसेना कदापि तडे जाऊ देणार नाही .
  • शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला , तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे.
  • शिवसेनाप्रमुख म्हणाले होते , “ मराठा – मराठेतर , शहाण्णव कुळी – ब्याण्णव कुळी , घाटी – कोकणी , ब्राह्मण – ब्राह्मणेतर , स्पृश्य – अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू ! ”
  • या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या ५५ वर्षांचे सार सामावलेले आहे . शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे .
  • शिवसेनेने आपले रंग सरडयासारखे बदलले नाहीत .
  • कष्टकरी , शेतकरी , नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरून पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे .

 

 

 

 


Tags: ajit pawarBJPsaamana editorialsanjay rautShivsenaUddhav Thackerayअजित पवारउद्धव ठाकरेभाजपाशिवसेनासंजय राऊतसामना अग्रेलख
Previous Post

भारतीय सैन्यात एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममधून ५५ जागांसाठी संधी

Next Post

पेटवण्यापेक्षा जागवण्यासाठी धडपडणारा नेता!

Next Post
sambhaji chhatrapati (2)

पेटवण्यापेक्षा जागवण्यासाठी धडपडणारा नेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!