Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home प्रेरणा

#प्रेरणा वन, वृक्षवल्ली, वनचरं…साऱ्यांचा सखा शिवसांब !

सरकारी वनसेवेत समरसून काम करणाऱ्या वनसेवकाची प्रेरणा कथा

January 22, 2021
in प्रेरणा
1
Shivsamb -2

निसर्ग जगणारा, निसर्ग जपणारा एक निसर्गाचा जाणकार म्हणजे शिवसांब घोडके! वनखात्याच्या सरकारी सेवेत असतानाही समर्पित भावाने आपलं कर्तव्य जणू वन, वनचरे, वृक्षवल्ली त्यांचे सखेच असल्यासारखे ते कर्तव्य बजावतात. आपुलकीनं सतत सेवारत असणाऱ्या शिवसांब घोडकेंचा प्रेरणादायी परिचय करून दिलाय त्यांच्याच बालमित्राने….

 

मराठवाडा!

मराठवाडा म्हटले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो भयावह दूष्काळ, भयंकर उष्णतामान आणि कोरडी उघडी बोडकी गवताळ माळरान. त्यातल्या त्यात जंगलाचा विचार करता नांदेड जिल्हा हा काही प्रमाणात प्रचंड दऱ्या, टेकड्या व नद्यांनी व्यापलेला. या जिल्ह्यातूनच दक्षिणेतील गंगा म्हणजे गोदावरी नदी वाहाते आणि नैसर्गिकरीत्या जिल्हयाच्या मधोमध वाहात असल्याने जिल्ह्यात जैवविविधते बाबतीत दोन भाग करत पूढे तेलंगणात जाते. गोदावरी नदीच्या उत्तरेकडील भाग हा नैसर्गिक साधनसंपत्तीने व्याप्त भाग व दक्षिणेकडील भाग मात्र नुसत्याच उघड्या ब़डक्या माळरानांच्या टेकड्या. जास्तीची कसदार जमीन नाही, पावसाची कमतरता. याच भागात जन्मल्याचे भाग्य मला लाभले. या डोंगराळ भागात येथील एक वेगळीच जैवविविधता साखळी फक्त येथेच आढळते. त्याच प्रमाणे येथील माणसेही अत्यंत मायाळू, कष्टाळू.

 

Shivsamb -8

या परिसरात मी शिक्षण शिकत असताना मला लाभलेला माझा जीवलग सखा सोबती, मला कायम मदतीस धावणारा, कायम सोबत असणारा, बालमित्र, वर्गमित्र शिवसांब घोडके या माणसाचे माझ्या जीवनातील स्थान जगावेगळे आहे. शाळेत दोघेही एकाच वर्गात जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो. पहिली ते चौथीपर्यंत शाळा होती. शाळेत सोबत एकत्रच बसायचो. शाळेच्या मधल्या सूट्टीत तो शाळेच्या जवळील मोकळ्या मैदानात असलेल्या अंबुसकंदाच्या मुळी काढून आणायचा व खूप आवडीने खायचा. तो एकही दिवस शाळा न बुडवणारा. त्याचा सोबत रहायला माझ्या घरूनही परवानगी असायची. कधीकधी शाळेच्या मधल्या सूट्टीत फड्या निवडुंगावरील लाल चुटूक असलेले फळ तो लाकडास तार बांधून खूप अलगत काढायचा. मोठ्या शिताफीने त्याफळावरील काटेवजा केस काढून खायचा. मलाही द्यायचा. कधीकधी शाळसमोरील चिंचेच्या झाडावरील चिंचा बेमालूमपणे झाडावर चढून चिंचा काढायचा.

Shivsamb -6

दर शनिवारी,रविवारी जनावरांना घेऊन आम्ही त्यांच्या दूरच्या नदीकडील  शेताकडे जायचो. त्यादिवशी मात्र आम्ही सात-आठजण असायचो. शेत गावापासून थोडे दूर असले, तरीसुद्धा तेथे निसर्गामध्ये खेळायला बागडायला, नदीच्या गुडघाभर पाण्यात पोहायला मिळायचं. कधी सिताफळ खायचं. कधी चार बोर, जांभूळ, आंबे, एरोणी, धामणीचे फळ, कार खाण्याची आमची मेजवानीच असायची! या रविवारी सिताफळ सर्वांनी फिरुन शेतात एक खड्डा करून त्यात गवत टाकून त्यात “माच” अगदी बेमालूमपणे कोणालाही समजणार नाही याची दक्षता घेत बनवायचो. तो खड्डा सिताफळांनी भरून अगदी जशी जमिन आहे तशीच करून घराकडे यायचो. आणि एखाद्या सुट्टीची वा येणाऱ्या शनिवारची वाट बघत बसायचो. जसा शनिवार आला अर्धा दिवस शाळा संपली की आम्ही थेट शेतात सिताफळ खाण्यासाठी जायचो. मनमुरादपणे सिताफळ खायचो, पोहायचो, तेथे किनीच्या झाडांवर असलेल्या सोनकिड्यांना पकडण्यात गुंतायचो. त्या उडणाऱ्या किड्यांचा पाठलाग करत झुडपांमधून पळायचो…पण सोनकिड्यांना पकडायचोच. आणि त्या किड्यांना माचिसच्या काडीपेटीत ठेऊन बाभळीचा पाला, ज्वारीचे पिठ खायला घालायचो, त्याला भुरभुर उडवण्यात लय भारी आनंद यायचा. त्या कोनाच्या किड्याने किती अंडी दिली याच्यावर घर्चा रंगायच्या. कधीकधी मोहोळही खायला भेटायचे.

Shivsamb -7

असे कायम शिवसांबसोबत निसर्गाच्या सानिध्यात बागडता बागडता बारावीच्या वर्गापर्यंत शिक्षण गावातच घेतले. पुढच्या शिक्षणासाठी आम्ही विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आम्ही सायकलने जाणेयेणे करायला सूरवात केली. जवळपास पाच किलोमीटर जाणे येणे एकाच सायकलवरती डबलशिट करायचो. आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात  नोकरीसाठी अर्ज करायचो करायचो व मुलाखतीही द्यायचो. अचानकपणे राज्यातील वनविभागातील जागेसाठी जाहीरात आलेली पाहीली व आम्ही दोघांनीही त्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. त्याला जास्त मार्कामुळे त्यास मुलाखतीसाठी निवड झाली. मलाही खूप आनंद वाटला. दोघापैकी एकजण मुलाखतीसाठी पात्र झालाय! त्याची मुलाखतही झाली आणि वनविभागात वनरक्षक या निसर्गसेवेच्या महत्वपूर्ण पदावर त्याची निवडही झाली. मला आनंदही झाला व आता वेगळे व्हावे लागेल या विचाराने दु:खही झाले. परंतु जड मनाने जिवलग मित्रास नोकरीवर रूजू होण्यासाठी निरोप दिला. आमच्या मैत्रीत भौगोलिक अंतर आले. पण मनाने मैत्रीची जवळिक तशीच जपली.

शिवसांब विदर्भातील जंगलात रूजू झाला. त्याला बालपणापासूनच जल, जंगल, पशूपक्षी, किटक यांचा सहवास लाभलेला असल्याने तो जंगलाच्या नोकरीत मनाने चांगलाच रमला. विविध पशुपक्षी, औषधी वनस्पती, झाडे, वेली यांच्या सहवासात तो रममाण झाला. जंगल क्षेत्रातील प्रशिक्षणात तो अनुभवाने समृद्ध असल्याने तसेच आवड असल्याने प्रशिक्षणाच्या बॅचमध्ये तो सर्वप्रथम आला. त्याने सुवर्णपदकही पटकावले.

वनखात्याच्या सेवेच्या सुरुवातीपासूनच शिवसांबची वन वन्यजीव यांच्या बद्दलची प्रचंड आस्था वाढीस लागलेली होती. जास्तीत जास्त वेळ तो ह्या वन्यपशूपक्षी, झाडांच्या सोबत घालवायला लागला. विदर्भातील पेंचसारख्या व्याघ्र प्रकल्पात असलेल्या अतिदुर्गम भागात तो राहिला. पेंच नदीच्या काठावर असलेल्या प्रचंड जैवविविधतेचे तेथेच राहून संरक्षण करतानाच अभ्यासही केला. स्थानिक लोकांमध्ये मिसळून वनस्पतीसंदर्भातील बारीकसारीक माहिती घेतली.  औषधीवनस्पती बाबतीत प्रचंड माहिती एकत्र जमविली होती.

Shivsamb -3

पाचसहा वर्ष विदर्भातील वन आणि वन्यजीवांची सेवा करून मराठवाड्यातील नांदेड वनविभागात परत आला. लहानपणापासून माहिती असलेल्या क्षेत्रात तो वावरू लागला. अर्थात सोबत माहितीचा प्रचंड खजाना घेउनच. पैनगंगा अभयारण्याच्या विदर्भाच्या सीमेस लागून, दूसरीकडे तेलंगणा राज्याची सिमा लागुन असलेल्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, डोंगराळ, प्रचंड मोठे जंगल असलेल्या किनवटसारख्या क्षेत्रात नियूक्ती झाली. त्याच्या बाळकडू अनुभवाच्या समृद्ध बळावर तो कामास लागला. त्याने कुणाचीही पर्वा न करता प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगल तस्करीला आळा घातला. जंगल तस्करांच्या मुसक्या आवळल्या. माननीय न्यायालयासमोर उभे करून जंगल तस्करांना अदद्ल घडवली. थोड्याच दिवसात तालुक्याच्या परिसरातील जंगल तस्करी नियंत्रणात आली. निसर्गाची कधीही भरून न येणारी हानी थांबवली. जंगलाचे संरक्षण केले. याचीच दखल घेउन त्याला राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या, मा. वनमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदकासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Shivsamb -4

किनवटसारख्या घनदाट जंगलक्षेत्र असलेल्या भागात औषधी वनस्पतीवर संशोधन करण्यासाठी खूप संशोधक येतात. पुणे, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर येथील बॉटनीचे संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली शिवसांबने औषधी वनस्पतींची प्रचंड माहिती एकत्र जमवली आहे. आदिवासी बांधव उपयोगात आणत असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती जवळून घेतली. औषधी वनस्पतींची माहिती एकत्र केली. दूर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींचे बी जंगलातून एकत्र करुन रोपवाटिकेत रोपे तयार केली. त्यांची लागवड जंगलक्षेत्रात केली आहे. किनवट परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था व नागरिक यांना निसर्गाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्यासाठी जनजागृती केली. विविध संस्था, मित्रपरिवार यांच्या सोबत झाडे लागवड केली. राज्यात सूरू केलेली हरित सेना (ग्रीन आर्मी) चळवळीत राज्यातील शक्य त्यांनी सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रपरिवारासह त्यांच्या क्षेत्रात लग्नाच्या निमित्ताने गेलो होतो. त्या लग्नात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना आहेर म्हनून प्रत्येकाला फळांची झाडे भेट देण्यात आली होती. हे सर्व बदल जनजागृतीमुळेच होताना दिसतात. लग्नानंतर निसर्ग भ्रमंतीसाठी त्यांच्यासोबत गेलो असता  अचानक काही मधमाशा  जवळपासच्या फुलांवर मकरंद एकत्र करताना दाखवल्या. त्यांचे बारीक निरीक्षण काही वेळ केल्यानंतर त्या कुठे जातात यावरून त्यांच्या पोळ्याचा शोध घेतला. हा शोध म्हणजे खूपच मोठी निसर्गनिरीक्षणाची बाब होती, जी इतरांना जमणे सोपे नाही.

निसर्ग भ्रमंतीत अत्यंत दक्ष राहून कान  व डोळे उघडे ठेऊन कशी माहिती घ्यावी हे लक्षात आले. अत्यंत लहानात लहान वनस्पती पासुन ते अवाढव्य वृक्षापर्यंत प्रत्येकजण आपापले जैवविविधतेतील स्थान आबाधित ठेऊन असल्याचे त्याच्या मार्गदर्शनामुळे समजले. आम्ही कधीच न बघितलेल्या बारीकसारीक वनस्पतींचे नाव व औषधी उपयोग तो तोंडपाठ केल्यासारखे सांगतो.

औषधी वनस्पतींच्या माहितीचे भांडार असणाऱ्या या अवलियास खूप दिवसानंतर भेटण्याचा योग आला तोही निसर्गाच्या सानिध्यातच…निसर्गाच्या कुशीत….निसर्गाच्या सहवासात!

 

 

  • विनायक हरिहर सोनवळे, नांदेड

 


Tags: ForestMaharashtra Forest DepartmentShivsamb Ghodkeकिनवटनांदेडवनखातेशिवसांब घोडके
Previous Post

“जगात जर्मनी भारतात परभणी”…मात्र पेट्रोलची इथं सर्वाधिक महागाई!

Next Post

‘सीरम इन्स्टिट्यूट’ आगीत पाच मृत्यू, “कोरोना लसीला धोका नाही!”

Next Post
Serum fire

'सीरम इन्स्टिट्यूट' आगीत पाच मृत्यू, "कोरोना लसीला धोका नाही!"

Comments 1

  1. Satish Sawant says:
    4 years ago

    खूपच सुंदर सर… शिवसांब सरांबद्दल मला जास्त माहिती नव्हती,आज त्यांच्या’बद्दल वाचायला मिळालं. खरंच खुपच छान कार्य….👌

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!