मुक्तपीठ टीम
सोशल मीडियावर शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या जळगावातील एका व्यक्तीला शिवसैनिकांनी भरचौकात चोप दिल्याचा प्रकार व्हायरल झाला आहे. या संबंधित व्यक्तीने माफी मागितली असता मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आणि काही लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे, केवळ शिवसेनेची सत्ता आहे म्हणून कायदा हातात घेणार का? सोशल मीडियावर लिहिले म्हणून सतत मारहाण करणार का? असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
- जळगावमध्ये एका अज्ञाताकडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
- त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होते.
- शिवसैनिकांपर्यंत हा मेसेज पोहचला.
- त्यांनी ही पोस्ट कोणाच्या मोबाइलवरून पहिल्यांदा पाठवण्यात आली आहे, याचा शोध घेतला.
- त्या संबंधित व्यक्तीला जाऊन गाठण्यात आले.
- भरचौकात आणून या व्यक्तीला चोप देण्यात आला.
- त्याने सुरुवातीलाच हात जोडून माफी मागितली.
- मात्र, शिवसैनिकांचा राग काही शांत झाला नाही.
- त्यांनी संबंधितांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली.
- यावेळी मोठी गर्दी होती.
- अनेकांनी ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला.
- अर्धातास हा प्रकार सुरू होता.
- संबंधित व्यक्ती म्हणाला की, मोबाइल माझ्या लहान मुलाच्या हातात होता.
- त्याने कार्टून असल्याचे वाटून दुसऱ्याला तो मेसेज पाठवला. त्याच्या वतीने मी माफी मागत म्हणत हात जोडले.
मुख्यमंत्री आणि गुलाबराव पाटलांची माफी मागायला लावली….
- निकांचा राग माफी मागितल्यानंतरही शांत झाला नाही.
- त्यांनी त्या व्यक्तीला पुन्हा दोन-चार फटके दिले.
- काही जणांनी मोबाइलसमोर माफी मागायला सांगितले.
- दुसऱ्याने मोबाइलवर शुटींग सुरू केले.
- संबंधित व्यक्तीने माफी मागायला सुरुवात केली.
- त्यावेळीस त्या व्यक्तीला इतरांनी कशी आणि कोणाची माफी मागायची हे सांगितले.
- त्यात मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली.