मुक्तपीठ टीम
यंदाचा राजधानी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक असणार आहे. अत्यंत दुर्मिळ अशा सुवर्ण होनाच्या साक्षीने राज्याभिषेक होईल. खासदार संभाजी छत्रपतींनी अत्यंत कष्टाने हा सुवर्ण होन मिळवला आहे. इतिहासकार, अभ्यासक, आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्यामुळे संभाजी छत्रपतींना शिवप्रेमींकडून धन्यवाद दिले जात असल्याचे योगेश केदार यांनी कळवले आहे.
हेही वाचा: संभाजी छत्रपती खऱ्या नेत्यासारखे वागले! बेजबाबदार पुढाऱ्यांसारखे नाहीत!
सुवर्ण होन हा ऐतिहासिक ठेवा
• हे ‘सुवर्ण होन’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतिक आहेत.
• महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि आपले ‘सुवर्ण होन’ स्वराज्यात चलनात आणले.
• हे सुवर्ण होन आता शक्यतो पाहायला मिळत नाहीत.
• हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच ते सध्या उपलब्ध असतील.
• आपण सहसा जे पाहतो, ती शिवराई असते.
• शिवराई आपल्याला खूप भेटतील. परंतु होन भेटणे अत्यंत दुर्मिळ.
यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
खासदार संभाजी छत्रपतींनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली माहिती
• यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘सुवर्ण होन’ च्या साक्षीने साजरा होणार…
• स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे.
• रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार.
हेही वाचा: रायगडावर कार्य अविरत, उन्हातान्हात संभाजी छत्रपतींची देखरेख