Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रणांगणात शिवरायांविषयीचे धडे गिरवण्याची संधी, ‘घे भरारी’ प्रदर्शनात ‘मावळा’ बोर्डगेमचा उपक्रम!

April 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Mawla board game

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे धडे खेळाच्या माध्यमातून गिरवण्याची, तसेच मुलांना खेळाच्या मैदानात शिवरायांचा ‘मावळा’ बनून इतिहास अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. २८ एप्रिल ते १ मे २०२२ या कालावधीत डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री ९ होत असलेल्या ‘घे भरारी’ या महिला व्यावसायिकांच्या भव्य प्रदर्शनात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ या बोर्डगेम बनवणाऱ्या मिती इन्फोटेनमेंटतर्फे ‘घे भरारी’ प्रदर्शनात हा अनोखा उपक्रम मुलांकरिता विनामूल्य आयोजित केला आहे, अशी माहिती अनिरुद्ध राजदेरकर, व्यंकटेश मांडके व शंतनु कुलकर्णी ह्यांनी दिली प्रसंगी घे भरारी प्रदर्शनाचे संयोजक राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी-एदलाबादकर हे उपस्थित होते.

अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले, “मिती इन्फोटेनमेंट या पुण्यातील संस्थेने बनवलेल्या ‘मावळा’ ह्या बोर्ड गेमने राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या भारतीय खेळांच्या स्पर्धेत ‘टॉयकॅथॉन’मध्ये नुकतेच विजेतेपद मिळवले आहे. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत १०१ घटनांवरील प्रवास महाराजांचा मावळा बनून अनुभवता येणार आहे. या प्रवासात शिवछत्रपतींसाठी लढलेले तब्बल २० स्वराज्ययोद्धे तुम्हाला या खेळात साथ देतात, तुम्ही दहा दुर्गांचे राखणदार बनता आणि राज्याभिषेकाला सर्वस्व स्वराज्याला अर्पून मानाचे स्थान मिळवता, असे या खेळाचे स्वरूप आहे. या प्रदर्शनात चारही दिवस रोज ५ ते ९ या वेळात ‘रणांगण’ हा खेळ रंगणार आहे.”

“हा खेळ सर्वसामान्यांपर्यंत अगदी सहज पोहोचावा, लहान मुलांना स्वराज्यलढ्याचा थरार अनुभवता यावा यासाठी ‘घे भरारी’ प्रदर्शनात जगातील सर्वात मोठ्या मराठी बोर्ड गेम प्रचंड स्वरूपात आणत एकाच वेळी १०० हून अधिक मुले हा खेळ खेळू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त स्वराज्यासाठी लढलेल्या ६० स्वराज्ययोद्ध्यांना मिती इन्फोटेनमेंटने त्यांच्या कल्पनेतून चित्रांत उतरवले आहे. या उपक्रमाद्वारे भावी पिढीला काल्पनिक पाश्चात्य सुपरहिरोंना अस्सल मराठी पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. ‘अफझलखान स्वारी’ या विषयावर असलेल्या ‘शेर शिवराज’ या आगामी चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, हेही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. सर्व सहभागी मुलामुलींना डिजिटल कौतुकपत्र देण्यात येणार आहे, या विनामूल्य खेळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९९६०८१२०१८ या क्रमांकावर किंवा the mavala या संकेतस्थळावर संपर्क साधावा .” असे राजदेरकर यांनी नमूद केले.

नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “महिलांसह सर्वांसाठीच वैविध्यपूर्ण उत्पादने, छोट्या दोस्तांसाठी भरपूर गेम्स, गोष्टीची पुस्तके, खेळणी बनवायचे वर्कशॉप, रंगकाम, पॉटरी मेकिंग असे उपक्रम या प्रदर्शनात असतील. हँडलूम कपडे, हँडमेड दागिने, ऑरगॅनिक प्रॉडक्ट, तांब्याची भांडी, कॉर्पोरेट गिफ्ट्स आदी स्टॉल्स असणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ हा रोमांचक गेम आणि अनेक मावळ्यांबरोबर सेल्फी हे या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आहेत. विविध प्रांतातून येणाऱ्या एक से एक साड्यांचे आणि वस्तूंचे डोळ्याचे पारणे फेडणारे कलेक्शन येथे बघायला मिळेल. ‘घे भरारी’ ग्रुप लघु उद्योजकांना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे प्रदर्शन २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन छोट्या व्यवसायीकांना प्रोत्साहित करावे.”

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Ghe Bhararigood newsMawla board gameMitti InfotainmentmuktpeethpuneShivrai Mawlaघे भरारीचांगली बातमीदैवत छत्रपती शिवाजी महाराजपुणेमावळा बोर्ड गेममिती इन्फोटेनमेंटमुक्तपीठशिवराय मावळा
Previous Post

चांद्रयान-३ ची जोरात तयारी, ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारीचं नियोजन

Next Post

टीव्हीएस मोटर कंपनी आणि पेट्रोनसची रेसिंग टीम! टू व्हिलर्स रेसिंगमध्ये भाग घेणार!

Next Post
Petronas TVS Racing Team

टीव्हीएस मोटर कंपनी आणि पेट्रोनसची रेसिंग टीम! टू व्हिलर्स रेसिंगमध्ये भाग घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!