मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करणारे शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. वैभव नाईक यांची एसीबीच्या पथकाकडून अर्धा तास कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांना पुढील चौकशीसाठी १२ ऑक्टोबर रोजी बोलविण्यात आले आहे.
एसबीने केली वैभव नाईक यांची चौकशी-
- एसबीकडे कोणीतरी तक्रार केली होती.
- या तक्रारीच्या आधारावर काल मला चौकशीसाठी हजर राहण्याचं एक समन्स मिळालं.
- प्राथमिक चौकशी देखील माझ्याकडे केली गेली.
- त्यांना जी माहिती हवी आहे ती सर्व माहिती मी त्यांनी सांगितलेल्या मुदतीच्या आतच देण्याच निश्चितपणे प्रयत्न करेन आणि त्यांना योग्य माहिती देईन..
- याशिवाय “२००२ ते २०२२ पर्यंत असं २० वर्षांचं विविरण मागितलं गेलं आहे, ते देखील मी देण्याचा प्रयत्न करेन.
…तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही!
- यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असल्याची शंका मला सुद्धा आहे.
- आम्ही उद्धव ठाकरे यांच्यसोबत प्रामाणिकपणे या अगोदरही राहिलो आणि यापुढील काळतही राहू.
- आमच्यावर कोणीही दबाव आणली तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही
- तर “निश्चतपणे भाजपाचे काही नेते यामागे असतील असा मला विश्वास आहे.
- अशाप्रकारे दबाव आणून आम्हाला भाजपात आणता येईल का असा जर प्रयत्न होत असेल तर त्याला माझा कायमच विरोध राहील.
त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही.