शिव घोडके
आजचा वन दिवस का साजरा केला जातो?
साजरा करण्यामागे उद्देश काय?
कोणी साजरा करावा?
वनदिवस साजरा करण्यासाठी काय काय करायला हवे?
याबाबत काही शब्दात मांडण्याचा प्रयत्न
निसर्गाचा समतोल ढासळत आसल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले त्यामुळे १९७१ मध्ये यूरोपीयन काँनफीडरेशन आँफ अँग्रीकल्चरच्या २३ व्या बैठकीत वन दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.
झाडं आहेत म्हणूनच सर्व काही आहे आणि वनांची आवश्यकता किती आहे हे सर्वांना समजावे व समाज जागृती करण्याचा हा उद्देश समोर ठेवून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय थीमसह वन दिवस साजरा करण्यासाठी वन दिवसाची स्थापना केली व प्रथम आंतरराष्ट्रीय थीमसह वन दिवस हा २१ मार्च २०१३ रोजी जगभर साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम आहे वनांचा जीर्णोद्धार करणे.
वनांनबाबत आस्था आणि वनांच्या ह्रासामुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना वनांन बद्दल योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल यासाठी वन दिवस साजरा करण्याचा उद्देश.
सजीवांना, जैवविविधता टिकवण्यासाठी व परिसंस्था आबाधित राहण्यासाठी, पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकुण जमीनीच्या किमान ३३% जंगले सणे सजीवांच्या हितावह आहे. ते नसतील तर अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागू शकते. वनांना दोन प्रकारे नुकसान पोहचू शकते ते म्हनजे १) नैसर्गिकरित्या २) मानवी हस्तक्षेपामुळे
वरील दोन प्रकारातील नुकसानी पैकी आपल्या हातात दुसऱ्या प्रकारचे नुकसान रोखण्याचे हातात आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नैसर्गिक व मानवी हस्तक्षेपामुळे काय काय दुष्परिणाम होवून वनाचे कसे नुकसान होते व ते कसे टाळता येवू शकते ह्याची माहिती घेऊ
प्रथम नैसर्गिकरित्या वनास कसे नुकसान होते ते पाहू.
१) वनात अत्यंत दुर्मिळ वेळीच नैसर्गिकरित्या वनास वनवा लागला जातो यामुळे वनाबरोबरच जैवविविधताही नष्ट होत सते
२)महापुर यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पूरात वनसंपदा नष्ट होत आसते
३)अवर्षण व दुष्काळ यामुळे पाण्याच्या आभावामुळे निर्माण होणारी अतिशय शुष्क परिस्थिती व अवर्षणामुळे जमीनी कोरड्या पडतात त्यामुळे वनस्पती सुकुन जातात.
४) भुकंप सहा रिश्टर पेक्षा जास्त मोठ्या भुकंपामुळे एखाद्या प्रदेशाची भुरचना बदलू शकते त्यामुळे त्या परिसरातील वनेही नष्ट होतात.
५) त्सुनामी प्रलयाच्या वेळी कांदळवनास खारफुटी वनास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
वरील प्रकारच्या नैसर्गिक नुकसानी असल्या तरी काही प्रमाणात मानवी हस्तक्षेपामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत परंतु मानवी हस्तक्षेपामुळे प्रचंड नुकसान वनास,जैवविविधतेस, परिसंस्थेस होते हेही बघू.
मानवाच्या विविध कृतींचा वनावर, जैवविविधतेवर, परिसंस्थेवर परिणाम होतो
१) लोकसंख्या वाढ, प्रचंड झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही वनास नुकसान पोहचवणारी प्रचंड मोठी गोष्ट आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे वस्तूंची मागणी वाढली. मानवास सामान्य परिस्थितीत वने ही गरजेपूरत्या गोष्टी पूरवू शकतात परंतु लोकसंख्या वाढीमुळे वस्तूंची मागणी वाढत राहीली परिणाम माणूस गरजा भागविण्यासाठी वनातून, निसर्गातून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहातोय त्यामुळे सर्वात मोठे नुकसान माणसामुळे वनास होत आहे.
२) लोकांचे स्थलांतरण ह्यामुळे एका ठिकाणी तयार केलेला परिसर सोडून लोक दूसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून नवीन ठिकाणाचे वन व निसर्ग नष्ट करण्याचे काम लोकांच्या स्थलांतरनामुळे होते त्यामुळे तेथील वनावर व निसर्गावर मोठे दुष्परिणाम दिसून येतात.
३) शहरीकरण लोकसंख्या वाढत जावून एका ठिकाणी राहाण्यासाठी शहरात मोठ्या वसाहती, ईमारती निर्माण कराव्या लागतात त्यामुळे शहराचा अकारमाण वाढत जावून शहराच्या जवळपास आसणाऱ्या वनांचा व निसर्गाचे फार मोठे नुकसान शहरीकरणामुळे होत असते.
४) औद्योगिकीकरण व दळणवळण व्यवस्थेत निरनिराळ्या धातू,लाकूड आणि वाळू यासारखा कच्चा माल मोठ्या प्रमाणात लागतो ती गरज भागवण्यासाठी नैसर्गिक वने, तोडून व्यापारी झाडांची लागवड केली जाते तसेच खाणीतून विविध धातू, कोळसा काढण्यासाठी वनांचे नुकसान होते. तसेच वाहातुकीसाठी रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे पसरावे लागते त्यामुळेही वनास नुकसान होते.
५) मोठ्या प्रमाणात पर्यटन व पर्यटनात येणाऱ्या बेफिकीर पर्यटकांनमुळे जाणते व अजानतेपने वनास नुकसान होवू शकते परंतु निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय करायला हवे व काय करू नये याची माहिती घेवून पर्यटन केल्यास नुकसान होण्यापसून वाटवता येवू शकते.
६) मोठी धरने यासाठी खूप मोठी जमीन गरजेची असते व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठे तयार होत आसतात त्यासाठी जमीनीवरील वनांना नुकसान होवू शकते.
७) युद्ध जमीन,पाणी,खनिज संपत्ती, आर्थिक व ईतर कारणांमुळे मानवी समुहात देशादेशात मतभेद होउन युद्ध होत असतात त्यात वेगवेगळ्या हत्यारांचा वापर होवून वनास व निसर्गास मोठे नुकसान होत आसते
वरीलप्रमाणे नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे वनास नुकसान होत असते जरी नैसर्गिक नुकसान टाळणे आपल्यास मोठ्या प्रमाणात शक्य नसले तरीसुद्धा मानवनिर्मित नुकसान मात्र आपण नक्कीच टाळू शकतो त्यासाठी आपण वैयक्तिक, सामुहिक, संस्थात्मक पातळीवर खालील बाबी करू शकतो.
१)वनांनबाबतीत जागृती
२)वने वाढवण्यासाठी कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देवू शकतो.
३)वने व निसर्गास आसलेले धोके याबद्दल शाळेत,महाविद्यालयात जागृती करता यईल
४) पथनाट्य, सिनेमा
५)लाकडांन ऐवजी अपारंपारिक व शास्वत उर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे
६)निसर्ग चित्र, निसर्ग छायाचित्रे यांच्या स्पर्धा आयोजित करणे
७)कमी पाण्यावर जगणारी झाडे लावने
८)सोशल मिडीयावर निसर्ग उपक्रमांची माहिती व जनजागृती करणे व निसर्गा विषयी जनजागृती करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे
९)निसर्गाबद्दल लेखन, निसर्ग कविता करणे
१०)वनांन बद्दल माहितीपर प्रश्नमंजूषा
११)विद्यार्थ्यांना वन सहल व जंगल अनुभव देणे
१२) वन संवर्धनास प्रोत्साहन व झाड तोडीस विरोध करणे
१३) वनातुन मिळणाऱ्या मौल्यवान साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करुन शाश्वत लाभ ठेवणे माहिती
१३)झाडांना त्रास होउ नये म्हनुन कार्य करणे
उदा:-खिळेमुक्त झाड अभियान
१४) निसर्ग पूरक बाबींचा वापर करणे यासारख्या अनेक बाबींचा वापर करून आपण मानवनिर्मित नुकसानी पासुन वनास वाचउ शकतो तसेच मानवनिर्मित नुकसान टाळल्यास काही प्रमाणात नैसर्गिक नुकसानही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वनाच्या संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत राहाणे गरजेचे आहे.
“पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पुर्ण करू शकते; परंतु माणसाची हाव मात्र पूर्ण करू शकत नाही.” — महात्मा गांधी