मुक्तपीठ टीम
पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना सेंटरसाठी जागा शोधली जात आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिरुरमधील विद्यार्थी वसतीगृहाची पाहणी करुन ८० खाटांची तयार सुविधा का वापरली जात नाही, असा प्रश्न विचारला आहे.
शिरुर खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे व भाजपा युवा मोर्चाचे शिरुर शहर अध्यक्ष उमेश शेळके, भाजपा उद्योग आघाडीचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आज सी टी बोरा कॉलेजच्या कोरोनासेंटरची पाहणी करताना शेजारच्या मुलांच्या वसतीगृहाला भेट दिली. तेथे
जवळपास एक महिन्यापासून ८० खाटांची सुविधा अक्षरशः धुळ खात पडलेली आढळली आहे.
शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना वेळेवर उपचाराची सोय उपलब्ध होत नाही. सध्या बोरा कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात कोरोना सेंटर सुरु आहे. पण शेजारीच मुलांच्या वसतीगृहाची जागा रिकामी आहे. दुसरीकडे शिरुर शहरातील उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना केअर सेंटर साठी नवीन जागा शोधल्या जात आहेत. ही जागा शिरुरकरांसाठी मध्यवर्ती आणि सोयीची आहे.
कोरोना रुग्णांना वार्यावर सोडून फक्त शासनाना आलेला निधी खर्च झाल्याचे दाखवण्यासाठी प्रशासन आणि राज्यकर्ते मग्न आहेत, असा आरोप संजय पाचंगे यांनी केला आहे.