मुक्तपीठ टीम
अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालेले आहे. निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर केले होते. अखेर शिंदे गटाला चिन्ह मिळालं आहे. या आधी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळालं आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं तर त्याचवेळी बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालेल्या शिंदे गटाची तिन्ही चिन्ह बाद करून नव्याने चिन्हांचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले.
त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.
त्रिशूळ नाकारण्याचे कारण काय?
- निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटले की, शिंदे गटासाठी निवडणूक चिन्हाचा पर्याय तुमच्याकडून देण्यात आला आहे, ते मुक्त चिन्हांच्या यादीत नाहीत.
- शिंदे गटाने दिलेला पर्याय २३ सप्टेंबर 2२०२१ रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेला आणि या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशाशी सुसंगत नाही, असेही म्हटले आहे.
- या क्रमवारीत आयोगाने त्रिशूळ हे धार्मिक प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
- निवडणूक चिन्ह म्हणून ते दिल्यास त्याचे उल्लंघन होईल, ज्या अंतर्गत कोणत्याही राजकीय पक्षाला धार्मिक किंवा सांप्रदायिक चिन्ह देता येणार नाही, असे म्हटले आहे.
- दुसरे कारण म्हणजे ठाकरे गटानेही ते आपल्या पसंतीस उतरवले.
उगवता सूर्य चिन्ह नाकारण्याचे कारण?
- शिंदे गटाला उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह देण्यासही निवडणूक आयोगाने नकार दिला.
- यामागील तर्क असा होता की ते द्रविड मुनेत्र कळघमचे निवडणूक चिन्ह आहे.
- द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचा प्रसिद्ध पक्ष आहे.
- त्याचवेळी, येथे दुसरे कारण म्हणजे ठाकरे गटाने त्यांच्या निवडणूक चिन्हांच्या निवडीतही त्याचा समावेश केला होता.
आयोगाने शिंदे गटाचे गदा हे चिन्ह नाकारले!!
- त्याचवेळी शिंदे गटाला गदा हे चिन्ह न मिळण्याचे कारण धार्मिक आहे.
- निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रानुसार अशी निवडणूक चिन्हे राजकीय पक्षांना देता येणार नाहीत, जी धार्मिक चिन्हे म्हणून वापरली जातात.
- निवडणूक आयोगाच्या निकषांवर आधारित, हे चिन्ह देखील मुक्त चिन्हांच्या यादीत नाही.