मुक्तपीठ टीम
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. दरम्यान पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीनं आपलं मौन सोडलं असून पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरुन ती अभिव्यक्त झाल्याचं पहायला मिळालं.
शिल्पा शेट्टीनं गुरुवारी रात्री आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये जेम्स थर्बरचे विचार मांडले आहेत, “रागानं मागे आणि भीतीनं पुढे पाहू नका. पण चोहीकडे पाहत सावध राहा. आपण रागानं वळून त्यांच्याकडे पाहतो, ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे. जो तणाव आपण सहन केला आहे. जे दुर्भाग्य आपण भोगलं आहे. आपण भीतीनं पुढे पाहतो, आपली नोकरी गमावण्याची भीती, आजारपणाची भीती किंवा मृत्यूनं गाठण्याची भीती. आपल्याला इथेच बदल घडवावा लागेल!”
“आता जे काही घडलं किंवा घडू शकत होतं, त्यामुळे अस्वस्थ व्हायचं नाही. परंतु डोळे उघडे ठेवायचे आहेत. मी एक दीर्घ श्वास घेते, मी भाग्यशाली असल्यानं मी मी जिवंत आहे, हे माहित असल्यानं मी एक दीर्घ श्वास घेते. यापूर्वी मी आव्हानांना तोंड दिलं आहे आणि भविष्यातही आव्हानांपासून सुखरुप राहिनं. माझं आजचं आयुष्य जगण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.”