मुक्तपीठ टीम
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला लोक एक अभिनेत्री म्हणून तर ओळखतातच परंतु तिची आणखी एक ओळख म्हणजे तिचा फिटनेस. लोक तिच्या फिटनेसचे व्हिडीओ पाहून प्रेरित होतात. अलीकडेच तिने एक पोस्ट इंस्टग्रामवर शेअर केली होती. ज्यात तिने राज कुंद्रा आणि त्यांच्या मुलांसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आता शिल्पाने चाहत्यांना कोरोना साथीत कसे सकारात्मक राहता येईल याचा मंत्र दिला आहे.
शिल्पा शेट्टीचा मंत्र सकारात्मकतेचा…
१. एकमेकांना मदत करा आणि एकत्र राहा.
२. आपण स्वतःशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे.
३. इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापूर्वी विचार करा की आपल्याला कशाची आवश्यकता आहे.
४. आपले आरोग्य, खाणे-पिणे, झोप याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत सर्व गोष्टी करा.
५. जेव्हा एखादा कठीण क्षण येतो, त्यावेळेस सरळ बसा आणि दीर्घ श्वास घ्या.
६. ज्यावेळेस तुम्ही निरोगी असाल तेव्हा तुम्ही आजूबाजूचे लोक बरे होण्यासाठी प्रयत्न करु शकता.
शिल्पा तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली की, “एकजुटीने रहा, आणि एकमेकांना मदत करा. आपण स्वतःशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. सर्व काही करण्यापूर्वी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यास प्राधान्य द्या आणि आपले लक्ष वेधून घ्या. कृपया आपल्या आरोग्याकडे, तसेच आपले खाणे-पिणे, झोप किंवा इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट छान आहे तेव्हा, पाठ ताठ ठेवा सरळ बसा, आपल्या जीभ तोंडात टाळूला लावा आणि आपले खांदे सैल करा. आपले डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी जेव्हा प्रसन्न वाटतात त्याचवेळेस आपल्यालाही आतून प्रसन्न वाटते.
कोरोना संसर्गाच्या दिवसांमध्येच शिल्पाने राज कुंद्रासोबत एक फोटो शेअर केला. यात शिल्पा, राज कुंद्राला अनोख्या अंदाजात किस करताना दिसत आहे. या फोटोमध्ये शिल्पाने डबल मास्क घातला आहे आणि तिच्या समोर एक काचेचा दरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे राज कुंद्रा उभे आहेत. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की- ‘कोरोना काळातील प्रेम! कोरोना प्रेम आहे’. शिल्पाने या पोस्टमध्ये आपल्या फॅन्सचे त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
View this post on Instagram